पेठ बीड पोलीसांनी तेलगाव नाका येथे माजलगावहून येणार्या टेम्पो क्र.एम.एच.१६ एवाय ८०३५ ला अडवल्यानंतर त्याची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलीसांनी तो टेम्पो ठाण्यात आणण्याऐवजी एका लॉन्सच्यापाठीमागे नेला. तेथे बराच वेळ चर्चा झाल्यानंतर टेम्पो घेवून चालक फरार याची माहिती वरिष्ठांना मिळाल्यानंतर पुन्हा पोलीसांनी रिकामा टेम्पो ठाण्यात आणून लावला. त्यानंतर चालक आणि मालकांला पोलीसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांनी गुटका लपुण ठेवल्याचे सांगितले. घोडका राजुरी परिसरातील एका खदाणीतून १० पोते गुटखा जप्त केला. त्याची एकूण किंमत १ लाख ३६ हजार रूपये आहे. मात्र सुरूवातीला पोलीसांनी जेंव्हा टेम्पो जप्त केला होता तेंव्हा तो गुटख्याने भरलेला होता. मात्र त्यामध्ये केवळ १० च पोते पोलीसांनी जप्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलीसांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे

No comments:
Post a Comment