बीड -- सन 2020 - 2021 या वर्षाकरिता बीड जिल्ह्यातील एकूण एकवीस वाळू घाट लिलावा करिता जाहीर करण्यात आलेले आहेत राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण समिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी बीड जिल्ह्यातील 21 वाळू घाटांना पर्यावरण विषयक मान्यता दिलेली असून या 21 वाळू घाटांचे ई टेंडर व इ ओक्शन या पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहेत या 21 वाळू घाटामध्ये गेवराई तालुक्यातील एकूण 17 माजलगाव तालुक्यातील 03 आणि परळी तालुक्यातील एक अशा 21 वाळू घाटांचा समावेश आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या 21 वाळू घाटांचा लिलावाचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरची वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया ई-टेंडर आणि ई-लिलाव या दोन्ही पद्धतीने होणार आहे याकरिता जे निविदा धारक वाळू लिलावात भाग घेऊ इच्छितात ते शासकीय संकेत स्थळ www.mahatenders.gov. in व e.auction.gov.in संकेतस्थळांवर निविदा आणि ई-लिलाव याबाबत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात व www.beed.nic च्या वेबसाईट वरती तसेच महाटेंडर च्या वेबसाईट वरती दिलेल्या लीलाव विषयक जाहिरातीच्या तपशिलाचे अवलोकन करून ही निविदा आणि इ लिलाव करिता यामध्ये भाग घेऊ शकतात सदर लिलावाची प्रक्रिया ही 12 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होऊन प्राथमिक फेरी 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार आहे या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये एखादा लिलाव धारक ई-निविदा भरू शकतो व वाळू घाटांची अधिकतम किमतीची बोली तो निविदा द्वारे सादर करू शकतो त्याचबरोबर तो लिलाव धारक लिलावामध्ये लिलावाच्या पद्धतीने ही बोली बोलू शकतो लिलाव धारक ई-टेंडर आणि ई-लिलाव यापैकी एका पद्धतीने या लिलावात सहभागी होऊ शकतात किंवा ज्यांना दोन्ही पद्धतीने लिलावात सहभाग घ्यावयाचा आहे ते दोन्ही पद्धतीने लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये निविदेमध्ये भाग घेतलेल्या सर्व व्यक्ती संस्था इत्यादींच्या निविदेचा तांत्रिक लिफाफा सर्वप्रथम ऑनलाईन उघडण्यात येईल इ लिलाव प्रक्रिया तद्नंतर पूर्ण करण्यात येईल त्यानंतर आर्थिक लिफाफा उघडण्यात येईल आणि तद्नंतर ई-निविदा व इ लिलाव या दोघांमध्ये जी बोलीची रक्कम जास्त असेल त्या रकमेचा लिलाव अंतिम करण्यात येईल सदर लिलावाच्या प्रक्रियेमध्ये प्रथम फेरीमध्ये ई-निविदा अथवा ई लिलाव या दोन्ही प्रकारांनी एकाही निविदा धारकाने अथवा बोली लावणाऱ्याने वाळूचा लिलाव मध्ये सहभाग घेतला नाही तर त्याची दुसरी फेरी 25 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत असेल दुसऱ्या फेरीतही ही निविदा आणि ई-लिलाव या मार्गाने कोणत्या वाळू घाटाला प्रतिसाद मिळाला नाही तर तिसरी फेरी 12 मार्च पासून ते 23 मार्च पर्यंत असेल मात्र वाळूचे लिलाव कोणत्याही तारखेला झाले तरी लिलावाचा कालावधी हा दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी संपुष्टात येणार आहे वाळू घाटांचे लिलाव झाल्यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर ती महसूल मिळणार आहे त्याचबरोबर अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारी सुद्धा त्यामुळे कमी होऊ शकतील त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील जनतेला वाळू सहजरीत्या उपलब्ध होऊ शकेल त्या अनुषंगाने अधिकाधिक लिलाव धारकांनी व निविदा धारकांनी या ऑनलाईन अशा निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे या लिलावाच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची व इतर सर्व पूरक बाबींची माहिती ही बीड जिल्ह्याच्या एनआयसीच्या वेबसाईट वरती त्याचबरोबर शासनाच्या जटेडर विषयक अधिकृत संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment