औरंगाबाद ( प्रतिनीधी)- औरंगाबाद येथे शिवसंग्रामच्या वर्धापनदिना निमित्त राज्यास्तरीय बैठक संपन्न यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये संघटनात्मक निर्णय, महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील महानगर पालिका, नगरपालिकासह विविध निवडणुका लढवण्यासंदर्भात चर्चा आणि निर्णय घेण्यात आले.
येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर संघटन बांधणीसाठी दौरा करण्यात येणार असून नव तरुणांवर जवाबदारी सोपण्यात येणार आहे..
सामाजिक प्रश्नांसाठी भलेही नुकसान झाले तरी चालेल मात्र समाजाच्या प्रश्नांवर कायमच शिवसंग्राम आवाज उठवेल. समाज हितासाठी कधीही शिवसंग्राम तोडजोड करणार नाही.
बैठकीच्या शेवटी सर्वानुमते विविध ठराव संमत करण्यात आले त्याप्रसंगी शिवसंग्रामच्या आमदार मा. भारतीताई लव्हेकर, प्रदेशाध्यक्ष मा. तानाजीराव शिंदे, प्रदेशउपाध्यक्ष मा. संदिप पाटील, प्रदेशसरचिटणीस मा. विक्रांत आंब्रे, चिटणीस मा. राम जगदाळे, प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, विदर्भ प्रमुख तथा वाशीम जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत गोळे, मा. संतोष तावरे, मा.प्रभाकर कोलांगडे, मा.किशोर चव्हाण, मा. सलिम पटेल इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment