Thursday, January 7, 2021

बीडमध्ये दि. 22 व अंबाजोगाईत 23 जानेवारीला थॕलेसेमिया व हिमोफिलीया मोफत शिबीर,, गरजू रुग्ण नागरिकांनी यात सहभाग घ्यावा-जिल्हाधिकारी राहूल रेखावार.


 बीड, दि.7  (जि.मा.का.) :- जिल्ह्यात थॅलेसेमिया व हिमोफिलिया रूग्णांची वाढत आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात बीड व अंबाजोगाई येथे  मोफत तपासणी शिबीर 22 व 23 जानेवारीला आयोजित केले आहे. यातून रुग्णांना मोफत औषधेपचार करण्यासह जनजागृती केली जाणर आहे. त्यामळे जिल्ह्यातील गरजू नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सूर्यकांत गित्ते यांनी केले आहे. 
जिल्हा आरोग्य विभाग व परभणी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप, परभणी च्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. थॅंलेसेमिया मेजर हा रक्तातील आनुवंशिक गंभीर आजार रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची लस अथवा औषध नाही. आजार झल्यानंतर एक वर्षाच्या आत बालकाला हा आजार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे जनजागृती हाच यावर एकमेव पर्याय आहे. हाच धागा पकडून परभणी येथील थॅंलेसेमिया सपोर्ट ग्रुपने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मोफत तपासणी व उपचार पध्दती सुरू केली . बीडमध्येही या आजाराचे रूग्ण आहेत . त्यामुळे बीड जिल्ह्यातही मोफत शिबीर घेण्याचे नियोजन केले आहे. सर्व थॅलेसेमिया ग्रस्त बालक व त्यांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदींनी केले आहे. नाव नोंदणीसाठी पिंपळगावकर (9422877947) व डॉ.जयश्री बांगर (9373025755), डॉ.रेश्मा मोकाशे ( 9284450036) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

  खालील ठिकाणी होणार शिबिर--
  गेवराई, माजलगाव, वडवणी, आष्टी, पाटोदा शिरूर व बीड तालुक्यातील रूग्णांसाठी 22  जानेवारी रोजी आदित्य वैद्यकीय महाविद्यालयात हे शिबिर होणर असून रक्त विकार तज्ञ डॉ तुषार इधाते ( औरंगाबाद) हे तपासणी करणार आहेत. तर परळी, धारूर, अंबाजोगाई व केज मधील रूग्णांसाठी स्व.रा.ती. ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई  येथे 23 जानेवारी रोजी आयोजित केले असून रक्त विकार तज्ञ डॉ. मनोज तोष्णीवाल  ( औरंगाबाद) हे तपासणी करणार आहेत. 

नियमीत रक्त व औषध पुरवठा.
या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रूग्णाला डॉक्टरांच्या सल्यानुसार सर्व औषधी व रक्त पुरवठा व इतर आवश्यक सर्व वैद्यकिय तपासण्या नियमितपणे मोफत केल्या जाणर आहेत. तसेच गेवराई, माजलगाव,  अंबाजोगाई, बीड परळी केज या ठीकाणी रक्त साठवणूक केंद्र कार्यन्वित आहेत, त्याठिकाणी रक्त संक्रमण व औषध उपलब्ध करून दिले जाणार आहेत. थॅंलेसेमिया व हिमोफिलिया या दोन्ही आजाराला संबंधित सर्व औषधसाठा थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या पुढाकाराने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

 *महात्मा फुले जन आरोग्य  योजनेतून उपचार*
  या दोन्ही आजारांच्या रूग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यामातून उपचार केले जाणर आहेत. त्यामुळे होणरा खर्च टळणार असून सर्वांनी पुढे यावे तसेच जवळच्या महा इ सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन नोंदणी करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.

*थॅंलेसेमियामुक्त बीड करण्यासाठी प्रयत्न*
  जिल्हा थॅंलेसेमिया आजार मुक्त करण्यासाठी आता प्रत्येक गर्भवती मातेची सर्व शासकीय आरोग्य संस्थेत पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत थॅंलेसेमियाची ही स्कीनींग नियमित केली जाणर आहे. यामुळे हया आजराचा बालक जन्माला येण्यापुर्वीच त्यावर नियंञन मिळवणे शक्य होईल. त्यामुळे याचाही लाभ घ्यावा, असे सांगितले आहे.
*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment