Sunday, December 20, 2020

पेट्रोल पंपावर मुलाला शस्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी.आरोपीस अटक पोलीसांची कारवाई.


वरोरा :- (प्रतिनीधी) आनंदवन चौकातील आदित्य पेट्रोल पंपावर पेट्रोल भरावरास गेलेल्या मुलाला शिविगाळ करून त्याला शस्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला नोंदविण्याल्यानंतर वरोरा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दोन्ही आरोपींना अटक करून त्यांचे कडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व मोपेड जप्त केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.२० वाजताच्या दरम्यान घडली.
अधिक माहितीनुसार स्थानीक टिळक वार्डातील रहिवासी, हार्डवेअर व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते बंडू देऊळकर यांचा मुलगा निशांत देऊळकर आपल्या मित्रांसह सांयकाळी ७.२० वाजताच्या सुमारास जवळच असलेल्या आनंदवन चौकातील आदित्य पेट्रोल पंपावर पेट्रोल भराव्यात गेला असता त्यावेळी टिव्हीएस ज्युपिटर क्रमांक एम. एच. ३४ बीपी ७३१५ ने आलेल्या २ अज्ञात व्यक्तिने मुलाला धमकाविले. मुलाने प्रतिप्रश्न करताच भडकून जाऊन अज्ञात व्यक्तिंनी गाडीतून धारदार हत्यार (खंजर ) काढून जीवे मारण्याची धमकी देत मुलांच्या दिशेने धावत आला. प्रसंगावधान साधून मुलांनी तिथून पळून पेट्रोल पंपाच्या ऑफीसात शरण घेतली. व झालेला प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली. मुलाचे वडील घटनास्थळी पोहचेपर्यंत दोन्ही अज्ञात व्यक्ति तिथून फरार झाले. मुलाचे कथन व पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या आधारावर बंडू देऊळकर यांनी दोन्ही अज्ञात व्यक्तिच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. फिर्यादी बंडू देऊळकर यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंद करून अवघ्या सहा तासांत आरोपी अनिल येलया लोणारे, वय २३ वर्षे व संदीप चिंतामण सोयाम, वय २९ वर्षे रा. वरोरा यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले धारधार हत्यार व टीव्हीएस ज्युपिटर असा एकूण ५१२०० रु चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाही पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांचे मार्गदर्शनात पो. उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे , सफो. विलास बलकी, नापोशी. किशोर बोढे, पोशि. दिनेश मेश्राम, सुरज मेश्राम, विशाल गिमेकर,कपिल भंडारवार, महेश बोलगोडवार यांनी पार पाडली

No comments:

Post a Comment