Wednesday, December 23, 2020

स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यु हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय सेवा योजने च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

परळी वैजनाथ - (प्रतिनीधी ): कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनातर्फे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे. रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले रक्तदान शिबिर (ता.२३) डिसेंबर बुधवार रोजी संपन्न झाले.
    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी शहरवासीयांचे काहीप्रमाणात योगदान असावे यासाठी शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नीलकंठ शेंडगे,तर उद्घाटक राष्ट्रवादीचे युवा नेते शरदभैय्या सोळंके, प्रमुख उपस्थितीत उत्तमराव देशमुख, प्रमुख पाहुणे लक्ष्मण मुरकुटे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, अंबाजोगाई येथील  एस.आर.टी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कृष्णा पवार, श्रीनिवास देशमुख, मुख्याध्यापक डी.जी.शिंदे, उपप्राचार्य सुनील लोमटे, अजय सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान संकलनाचे काम अंबाजोगाई येथील एस.आर.टी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागाने केले. सदरील रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नीलकंठ शेंडगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.अंकुश वाघमारे,कार्यक्रमाधिकारी प्रा. बी.ए.कदम यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस.एस.कार्यक्रमाधिकारी प्रा.श्रीहरी गुट्टे यांनी केले.

No comments:

Post a Comment