परळी वैजनाथ (प्रतिनिधी)राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा आदर्श शिक्षिका सौ.शमीम राजमोहमंद शेख यांचा आज गुरूवार दि.24 डिसेंबर रोजी परळी तालुक्यातील मौजे संगम येथे सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा आदर्श शिक्षिका सौ.शमीम शेख यांनी आज गुरूवारी संगम येथील सरपंच सौ.वच्छालाबाई कोकाटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसगी कोकाटे परिवाराच्या वतीने शेख यांचा संगमच्या सरपंच सौ.वच्छालाबाई कोकाटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ.ज्योती रामेश्वर कोकाटे, आशा कार्यकर्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षा सौ.वर्षा बबनराव कोकाटे, सौ.डॉ. नेहा अर्षद शेख ,डॉ.अर्शद शेख, बबन कोकाटे, अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment