हिंगणघाट - (प्रतिनिधी)हिंगणघाट आगारात बसेसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने ग्रामिण भागातील फेर्यांवर त्याचा परिणाम झाला असुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे.
परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगाराच्या माध्यमातुन नागपूर,वर्धा ईत्यादीसह राज्यातील मोठ्या शहरासोबतच हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील ग्रामिण भागातील प्रवासी वाहतुक संचालित केल्या जाते.कोरोनामुळे संचारबंदी लागल्याने मागील नऊ महिन्यापर्यंत परिवहन मंडळाची प्रवासी वाहतुक बर्याच कालावधीपर्यंत बंद होती.आता जनजीवन सुरळीत झाले असुन महत्वाचे म्हणजे शाळा सुरु झाल्याने प्रवाशांसोबत विद्यार्थ्यांनाही हिंगणघाटकडे धाव घ्यावी लागत आहे.परंतु परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगारात बसेसची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने ग्रामिण भागात बससेवा अद्याप पर्यंत पुर्णपणे पोहचु शकलेली नसल्याने प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.कारण ग्रामीण भागातील नागरीक शहरात येण्यासाठी प्रवासी वाहणांचा आधार घेतांना दिसतात. परंतु प्रवासी वाहनाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजणे पासधारक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य होऊ शकत नाही.आनलाईन शिक्षणात मोबाईल व नेटवर्क अभावी शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असतांनाच आता प्रवासाच्या सोई अभावी शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे. अशातच अद्यापर्यंत हिंगणघाट पासुन चिकमोह,वणी,जांगोना,परडा,डोंगरगाव,करुड पवनगाव ईत्यादी अनेक गावांपर्यंत बससेवा पोहचु शकलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
बारा बसची कमतरता - आगार व्यवस्थापक नेवारे
हिंगणघाट आगारात सध्या जवळजवळ बारा बसेसची कमतरता असल्याने आम्ही पुर्ण फेर्या चालवु शकत नसल्याचे परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापकवारे यांनी सांगीतले.
प्रत्यक्षात हिंगणघाट आगारात ७२ बसेस होत्या.त्यातील १० मालवाहू वाहणे बनली.आठ बस पासिंगसाठी गेल्या असुन ईतर बंद स्थितीत आहेत.सध्या हाताशी ५० बसेस असुन त्यांच्या माध्यमातुन ५६ सेड्युल चालविण्याच्या आम्ही प्रयत्नात असल्याचे पुढे बोलतांना नेवारे म्हणाले.तसेच कोणतीही फेरी चालवतांना आम्हाला उत्पंनाचाही विचार करावा लागत असला तरीही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ग्रामिण भागातील पुर्ण फेर्या चालु करण्याच्या प्रयत्नात आम्ही असल्याचेही त्यांनी सांगीतले.

No comments:
Post a Comment