Wednesday, December 16, 2020

स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यु हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने रा.से.यो.च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी ): कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनातर्फे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे. रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने (ता.२३) डिसेंबर गुरूवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी शहरवासीयांचे काहीप्रमाणात योगदान असावे यासाठी शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांसह शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. असे आवाहन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एच.शेंडगे, उपप्राचार्य सुनील लोमटे, व कार्यक्रमाधिकारी प्रा. श्रीहरी गुट्टे, न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ. अंकुश वाघमारे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment