
पदवीधर मतदारसंघांमध्ये झालेल्या पराभवाने भाजपला धक्का बसला आहे. पुणे आणि नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले यात ढसळून गेले आहेत. या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार शरसंधान केलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या पराभवावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, पराभव स्वीकारला पाहिजे. पराभवाची कारणेही शोधली पाहिजे. शिवसेनेला सुद्धा मित्रपक्षाची कमतरता जाणवली असेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
विजयाचा कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही त्यामुळे शरद पवार बोलतात पुढील 25 वर्षे सत्तेत राहू असं होत नसतं. तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे आमचा पराभव झाला हे मान्य आहे. मात्र येत्या काळात आमची स्ट्रटिजी वेगळी असेल. शिवसेनेला आता आत्मपरीक्षण करावं लागेल. शिवसेनेच्या पाठीत अमरावतीमध्ये राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असंही त्या म्हणाल्या .
No comments:
Post a Comment