Tuesday, December 15, 2020

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये तसेच कोविडच्या अनुषंगाने खबरदारी दक्षता घेण्याचे निर्देश.


बीड, दि.15:- राज्यातील एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मूदत संपणाऱ्या व नव्याने स्थापितहोत असलेल्या सुमारे 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार असून या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या निवडणूका निर्भय, शांत व पारदर्शकपणे पार पडण्यासाठी आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.  
निवडणूकीची  प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक पध्दतीनेपार पाडण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोविडच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी बाबत राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत त्यांचे पालन केले जावे असे सूचित केले आहे.
 ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदर निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून निवडणूकीचा निकाल  जाहिर  होईपर्यत आचारसंहिता लागू राहिल. मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही   कृती व घोषणा मंत्री, खसदार , आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांना आचार संहिता कालावधीत करता येणार नाही.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राबवत असताना कोरोना (कोवीड-19) च्या शासन निर्णयातील नियमांचे सर्व संबंधित विभागाने तंतोतंत पालन करुन कोरोना संसर्गापासून दूर रहावे. तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक  निवडणूकी कालावधीत दक्ष राहण्याच्या सूचना विविध विभागाना दिल्या आहेत.
00000

No comments:

Post a Comment