गोरेगाव,दि.16:- केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल च्या किमतीत वाढ शेतकऱ्यांपासुन ते सर्व सामान्य नागरिकांना या दर वाढीचा फटका बसला आहे.एकीकडे कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे रोजगार गेले,शेत पीक रोगराईने उत्पादनात घट झाल्याने दर वाढ आवाक्याबाहेर चे आहे. ही इंधन दर वाढ केंद्र सरकारने मागे घ्यावे, केंद्रीय राज्यमंत्री दानवेवर देश द्रोहाचा खटला दाखल करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना गोरेगाव तालुका प्रमुख मेघराज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पंतप्रधान यांच्या नावाने गोरेगाव तहसीलदार यांना देण्यात आले.
पेट्रोल, डिझेल च्या किमतीत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्व सामान्य माणसाला परवडणारे नसुन ही दरवाढ जीवघेणी आहे.ती दरवाढ मागे घेण्यात यावी.त्याच बरोबर तीन कूषी अध्यादेशाच्या निषेधार्थ शेतकरी आंदोलन सुरू आहे.या आंदोलना विरोधात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आक्षेपार्थ विधान केले आहे.त्यांचे विधान देशद्रोही असल्याने त्यांच्या विधानाचे शिवसेना गोरेगाव तालुका निषेध नोंदवित असुन दानवेवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा व पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात शिवसेना गोरेगाव तालुका ने म्हटले आहे. निवेदन देतेवेळी मेघराज चौधरी, शहर प्रमुख बालु नागनाथे, उपतालुका प्रमुख लेखचंद लांजेवार,देवानंद येळणे, विभाग प्रमुख अभय गमधरे, मिताराम काठेवार, शहर संघटक राहुल नरोले, बंटी चौधरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment