Sunday, December 13, 2020

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना मास्क व सॅनिटायझर वाटप.

*महादेव इटके व सहकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने परळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना मास्क व सॅनिटायझर वाटप कार्यक्रम आज आज शनिवार दि 12 डिसेंबर रोजी मान्यवर व शिक्षकांच्या उपस्थित संपन्न झाला.  भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव इटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक सर्व स्तरातून आहे.

आज शनिवार दिनांक 12 डिसेंबर रोजी लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त परळी शहरातील मिलिंद विद्यालय श्री सरस्वती विद्यालय विद्यावर्धिनी विद्यालय व वैजनाथ विद्यालय येथे विद्यार्थी व शिक्षकांना मास्क व सनिटायझर चे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगर अध्यक्ष वैजनाथ जगतकर, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी, भाजपा उपाध्यक्ष महादेव इटके, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक केशव माळी, सेलू सोसायटी चेअरमन बाळू फड, मुद्रा लोण समितीचे सदस्य सुशील हरंगुळे, नरेश पिंपळे, राजेश कौलवार, अमर मोगरकर, सुनील चाटुफळे, खाजाभाइ थळकरी, मुन्ना कापसे, कृष्णा बेदरकर, विशाल कांबळे यांच्यासह श्री सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर मिसाळ, मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार सर, विद्यवर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश मातेकर सर
वैद्यनाथ विद्यालयाचे उप मुख्याध्यापक हांगीरगे सर, हरीश देशमुख, पठाण सर, राजनाळे सर, लोणीकर सर यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोविड19 या जागतिक महामारीच्या काळात आतापर्यंत बंद असलेल्या शाळा आता चालु झाल्या असून विद्यार्थी व शिक्षकांना वैयक्तिक सुरक्षेसाठी व कोविड 19 रोग पसरण्यास प्रतिबंधासाठी मास्क व सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम आज 12 डिसेंबर 2020 रोजी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. दरम्यान महादेव इटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना रोगाच्या काळात भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू कुटुंबाना धान्य व रेशन किट वाटप करण्यात आले होते.   शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना मास्क व सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने 12 डिसेंबर 2020 रोजी परळी शहरातील मिलिंद विद्यालय, श्री सरस्वती विद्यालय, विद्यावर्धिनी विद्यालय व वैजनाथ विद्यालय येथे शाळेतील शिक्षक वृंद व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव इटके तर आभार प्रदर्शन  अश्विन मोगरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  आयोजक भाजपा उपाध्यक्ष महादेव इटके, अश्विन मोगरकर, सुशील हरंगुळे, राजेश कौलवार, केदार देशमुख, मुंज फूके, बाळू फुले, पवन तोडकरी, कृष्णा बेदरकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment