परळी वैजनाथ ;-- धनंजय मुंडे हाच श्वास अन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढ हाच ध्यास असणारे परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे .त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले असून या घटनेमुळे परळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुछ तो गडबड है अशी चर्चा सुरू झाली आहे .
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून परळीतच नव्हे तर संपूर्ण राज्यात ओळख असलेले बाजीराव धर्माधिकारी यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी मोठे मजबूत संघटन उभे केले होते .

धनंजय मुंडे यांनी पक्षांतर केल्यानंतर जे लोक सोबत आले त्यात बाजीराव आघाडीवर होते .गेल्या वीस तीस वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात असणाऱ्या बाजीराव यांच्यासाठी धनंजय मुंडे हेच नेता आणि पक्ष आहेत .त्यामुळेच डीएम यांचा चाणक्य अशी त्यांची ओळख आहे .

परळीत सत्तांतर झाल्यानंतर बाजीराव यांच्याकडे नगराध्यक्ष पदाची जबाबदारी आली,नगर पालिका असो की जी प अथवा लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक प्रत्येक वेळी बाजीराव यांनी मजबुतपणे यंत्रणा सांभाळली आहे .
विधानसभा निवडणुकीत डीएम यांचा जो मोठा विजय झाला त्यात परळी शहराचा अन बाजीराव यांचा सिंहाचा वाटा होता. नगर पालिकेत देखील 27 नगरसेवक निवडून आले त्यावेळी बाजीराव यांनी डोअर टू डोअर जाऊन प्रचार केला होता
नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत देखील शहरात बाजीराव यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला .मात्र त्यांचा हाच प्रचार त्यांच्यावरील नाराजीला कारणीभूत ठरला आहे .मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदान पार पडल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नगरसेवक यांनी थेट डीएम यांच्याकडे तक्रार केली .
अण्णा,भैय्या आणि शेठ हे त्यात आघाडीवर होते .बाजीराव यांनी देखील मी साहेबांचा माणूस आहे,मला पदाचा मोह नाही,साहेब हेच पद अन साहेब देतील तो आदेश आ म्हणत आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला .
No comments:
Post a Comment