बीड :- (जि.मा.का) 31 डिसेंबर 2020 पुर्वी दस्त निष्पादन करून मुद्रांक शुल्क दिनांक 31 डिसेंबर 2020 पुर्वी भरल्यास पुढील 4 महिन्यापर्यंत दस्ताची नोंदणी करता येईल. त्यामुळे पक्षकारांनी गर्दी करण्याची आवश्यकता नाही.
शासनाने दिनांक 31 डिसेंबर 2020 पावेतो दस्त नोंदणी केल्यास 3% मुद्रांक शुल्कात सवलत घोषित केलेली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा जिल्हयात सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी सुरू राहणार आहेत.
जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात सदर ठिकाणी खरेदी विक्री दस्तनोंदणी कामे चालू राहतील. दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुद्रांक शुल्कात सुट देण्यात आली असल्याने सध्या प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकाराची गर्दी होत आहे. तथापि पक्षकारांनी येाग्य त्या मुद्रांक शुल्काचे चलन दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत काढून ठेवले असल्यास व दस्त सुध्दा दि. 31 डिसेंबर 2020 पुर्वी निष्पादन (दस्तावर स्वाक्षरी) केल्यास दस्ताची नोंदणी कार्यालयात येऊन पुढील 4 महिने म्हणजे माहे एप्रिल-2021 पर्यंत याच दरामध्ये नोंदणी (सुट दिलेल्या) करता येईल. त्यामुळे एकाच वेळी सर्व नागरीकांनी गर्दी न करता ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा करावा व दस्त निष्पादीत करावे असे आवाहन अनिल नढे, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*
No comments:
Post a Comment