
* निवडणुक येताच चव्हाणांना पदवीधरांची आठवण आली
मराठवाड्यातील पदवीधारात निष्क्रीय आमदारा विरोधात संताप.
बीड (प्रतिनीधी ):- पदवीधर मतदार संघाचं प्रतिनिधीत्व गेल्या 12 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.सतिष चव्हाण हे करत आहेत. त्यांनी दोन्ही निवडणूकीतबेरोजगारांचे आणि पदवीधारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. बारा वर्षात त्यांनी कुठलेही प्रश्न सोडले नाही. आता पुन्हा तिसर्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना पदवीधारांची आणि बेरोजगारांची आठवण आली. अशा निष्क्रीय आमदाराच्या विरोधात पदवीधारात संताप व्यक्त केला जात आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव आहेत. असे असतांनाही त्यांनी किती बेरोजगारांना मराठवाडा शिक्षण प्रसारकमंडळामध्ये सामावून घेतले असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळेस निष्क्रीय आमदारांना धडा शिकवण्याचा निर्धार पदवीधारांनी केला असल्याचेदिसून येत आहे.गेल्या काही दिवसापूर्वी पदवीधर मतदार संघाची निवडणूक घोषीत झाली.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ.सतिष चव्हाण हेतिसर्यांदा रिंगणात उतरले. त्यांनी मराठवाड्यात प्रचाराला सुरूवात केली.मात्र सतिष चव्हाण यांच्या बारा वर्षाचा कार्यकाळ हा अत्यंत निष्क्रीय ठरलेला आहे. त्यांनी या दोन्ही निवडणूकीत मराठवाड्यातील पदवीधारांना आणि बेरोजगारांना मोठमोठे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पुर्तता केली नाही. बेरोजगारांचे आणि पदवीधारांचे त्यांनी कधी प्रश्नसोडवले नाही किंवा त्यांच्या भावानाही समजून घेतल्या नाहीत. आता मात्र त्यांना पदवीधारांचा पुळका आला आहे. बारा वर्षामध्ये खूप काही करता आलं असतं. बेरोजगारांचे मेळावे घेवून त्यांना रोजगाराचे साधन निर्माण करूनदेता आले असते. पण चव्हाण हे फक्त बाता मारण्यातच पटाईत आहेत. पक्षाचा मराठवाड्यात कार्यक्रम असेल तर ते फक्त स्टेज पुरतेच मर्यादीत असतात.
मात्र सोयीस्करपणे कार्यकर्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करत असतात. असं
असतांनाही पक्षाने पुन्हा त्यांना तिसर्यांदा निवडणूकीच्या रिंगणात
उतरवल्याने त्यांच्या विरोधात मराठवाड्यातील पदवीधारात संताप व्यक्त केलाजात आहे. विशेष म्हणजे आ.चव्हाण हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव
आहेत. एवढ्या मोठ्या शिक्षण प्रसारक मंडळात असतांना त्यांनी
मराठवाड्यातील किती बेरोजगारांना मंडळाच्या माध्यमातून नोकर्या उपलब्धकरून दिल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निष्क्रीय आमदारांनाराष्ट्रवादीने तिसर्यांदा निवडणूकीत उतरवल्याने मराठवाड्यातीलरा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह पदवीधारात नाराजीचा सूर दिसून येत आहे.विना अनुदानीत शिक्षकांचा चव्हाणांना प्रश्नाचा भडीमारगेल्या 20 वर्षापासून विना अनुदानीत शिक्षक वेठबिगारासारखं काम करत आहेत.त्यांचे संसार रस्त्यावर आहेत. याबाबत वारंवार या शिक्षक संघटनांनीआंदोलने केली. पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार यांना निवेदन दिले. मात्र
गेली पंधरा वर्षे अक्षरश: या शिक्षकांना पदवीधर आमदार चव्हाण यांनी
वेड्यात काढल्यामुळे ज्या ठिकाणी मतमागणीसाठी चव्हाण जातात, मेळावा घेतातत्या ठिकाणी हे विना अनुदानीत शिक्षक चव्हाणांना अनुदानाच्या प्रश्नाचाभडीमार करतात. त्याबाबत चव्हाण हे त्या मेळाव्यातून पळ काढतात.दौर्याला आणिप्रचारालाप्रतिसाद नाही
निवडणूक घोषीत होताच आ.सतिष चव्हाण यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली.
त्यांचे कार्यकर्ते मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यासह तालुक्यात बैठका
घेत आहेत. मात्र या बैठकांना तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत
आहेत. त्याच बरोबर बीड जिल्ह्यात ज्या काही बैठका झाल्या आहेत त्या
बैठकातही आ.चव्हाणांविरोधात प्रचंड प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून आले.
No comments:
Post a Comment