परळी वैजनाथ (प्रतिनिधी)शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष भोजराज पालिवाल यांनी दुर्गोत्सवाची सांगता आणि आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाप्रसादा ऐवजी परिसरातील मान्यवर नागरिकांसोबत गोरगरीब गरजूंचे तोंड गोड केले आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवाची सांगता महाप्रसादाने होत असते परंतू कोरोनामुळे गर्दी टाळण्यासोबतच घरोघरी खिचडी आणि गोड पदार्थ पालिवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पोाहचविले आहेत. तसेच कोरोना विषाणूपासून आपले संरक्षण कसे करावे याबाबतची पत्रके वितरित केली.
वाढदिवस तसा नेहमीच सर्वांच्याच उत्साहाचा असतो, कोणी केक कापतो तर कोणी मोठ्या हॉटेलात पार्टी सुद्धा करतो. भोजराज पालिवाल हे परळी शहरातील सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय असलेले एक नेतृत्व असून त्यांनी दुर्गोत्सवाची सांगता आणि वाढदिवस असे समीकरण एकत्र करून परिसरातील गरजूंना जेवण देण्यासोबतच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे तोंड गोड केले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूपासून आपले संरक्षण कसे करावे याबाबतची पत्रके वितरित केली. केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर संपर्क कार्यालयात केक कापला परंतू आपले नाते या परिसरातील नागरिक आणि सामान्य जनतेसोबत जोडले असल्याने त्यांनी वाढदिवसानिमित्त सर्वांचे तोंड गोड केले. दरम्यान आपण वाढदिवस साजरा करणार नव्हतो, दुर्गोत्सवाची सांगता आणि वाढदिवसाची तारीख एकच आल्याने वेगळया पध्दतीने हा उपक्रम राबविल्याचे भोजराज पालिवाल यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना परिवारातून तसेच डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, सामाजिक, राजकिय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छांचा अक्षरश: वर्षावच झाला. विविध सामाजिक माध्यमांसह प्रत्यक्ष भेटून तसेच दुरध्वनी, ई मेल द्वारेही हितचिंतकांनी पालिवाल यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या मला आलेल्या शुभेच्छा हा माझ्यासाठी एक आशिर्वाद असून भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठीची प्रेरणा आहे या शब्दात पालिवाल यांनी शुभेच्छूकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेेचे माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके, वैद्यनाथ बॅंकेचे संचालक नारायणराव सातपुते, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी, विशाल सुगरे, प्रकाश साळुंके, हरिष पालीवाल, अण्णासाहेब कुंभार, विजय जाधव, शिवाजी दराडे, संदीप चौधरी, सचिन स्वामी आदींसह अनेकजण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment