Friday, October 16, 2020

बीड सर्व शिक्षा अभियानचे अधिकारी, कर्मचारी १७ वर्षापासून एकाच ठिकाणी .


* एकाच ठिकाणी सिईओ अजित कुंभार यांचे दुर्लक्ष कशामुळे?


बीड (प्रतिनीधी )ः- सर्व शिक्षा अभियानमधील वर्ग तिनचे अनेक कर्मचारी  एकाच ठिकाणी १७ वर्षापासून काम करत आहे. राज्य सरकारातील कर्मचार्‍यांचे तिन वर्षाला बदली होते. कंत्राटी कर्मचार्‍यांना आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना एकच नियम आहे. मात्र हे सर्व शिक्षा अभियानमधील कर्मचारी सरकारचे जावाई असल्यासारखे एकाच जागी ठाण मांडून बसले आहे. गेल्या तिन वर्षापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार हे सर्वच कामे नियमाला धरुन करतो असे आव आणतात. मात्र जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात डोकावून पाहिले तर सर्वत्र आनागोंदी दिसत आहे.

सर्व शिक्षा अभियानमध्ये साधन व्यक्ती या पदावर ७३ व्यक्ती काम करतात. विषय तज्ञ या पदावर ६६ व्यक्ती काम करतात. तर अपंगाचे विशेष शिक्षक म्हणून २३ जण काम करतात. यांच्या नियुक्तया गेल्या १७ वर्षापूर्वी कंत्राटी पध्दतीने झाल्या. प्रत्येक सहा महिन्याला यांच्या नियुक्तीच्या आदेश कंत्राटी पध्दतीने परत काढले जातात. गेल्या काही वर्षापूर्वी या कर्मचार्‍यांची सेवा जिल्हा प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्याकडे वर्ग केल्यानंतर कंत्राटी पध्दतीने ऑर्डर काढणे, सेवा समाप्त करणे, सेवा पुढे चालू ठेवणे हे सर्व अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे आहे. जे कर्मचारी नियुक्त झाल्यापासून कंत्राटी पध्दतीने एकाच गट शिक्षण अधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेले आहे. या कर्मचार्‍यांने प्रत्येक शाळेत जावून तेथील शिक्षकांना मार्गदर्शन करणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, अडचण समजून घेणे असे असतांना हे सर्व महाशय गट शिक्षण अधिकारी कार्यालयात बसून इंग्रजी, गणीत आणि विज्ञान या विषयाच्या शिक्षकांना गट शिक्षण अधिकारी कार्यालयात बोलावून घेवून अभिप्राय पुस्तकात स्वतः शाळेला भेट दिल्याचे लिहून घेतात. आणि कंत्राटी पध्दतीनेच भरघोष पगार उचलतात. काही अपंग फिरते शिक्षक(मोबाईल टिचर) मात्र शाळेला भेट देण्यासाठी जातात हा ऐवढाच अपवाद या कर्मचार्‍यांच्या सेवा प्रत्येक सहा महिन्याला नियमीत करण्यासाठी यांच्या बदल्या केल्या पाहिजेत अशी सर्वच क्षेत्रातून मागणी आहे. जिल्ह्याच्या पशु संवर्धन विभागातही तब्बल विस वर्षापासून अनेक कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून आहे, जिल्हा परिषदेच्या प्राथमीक विभागतही गोंधळ सुरू आहे. या सर्व बाबी कर्तव्यदक्ष म्हणून स्वःताची पाठ थोपटून घेणार्‍या कुंभार यांनी गार्ंभीयाने का घेत नाही? की त्यंाचे यात काही हितसंबंध गुंतले आहे हे कळायला मार्ग नाही

No comments:

Post a Comment