*बीड जिल्ह्यातील प्रारुप यादीतील मतदान केंद्रांबाबत हरकती व सूचना सादर करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन.
बीड, :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्राची ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक २०२० चा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार आहे. त्यादृष्टिकोनातून सदर निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील मतदान केंद्र व सहाय्यकारी मतदान केंद्रासह ८१३ मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीचे नांव, मतदान केंद्राची व्याप्ती निश्चित करण्यात आलेली आहे.
०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक २०२० साठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्राची यादी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, यांचे नोटीस
बोर्डवर दिनांक ०६ आॅक्टोबर २०२० रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद व जिल्हाधिकारी कार्यालयांचे संकेतस्थळावर परीक्षणासाठी तसेच मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
बीड जिल्ह्यातील मतदान केंद्राची प्रारुप यादी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांपर्यत म्हणजेच दिनांक १३ आॅक्टोबर २०२० पर्यत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांचेक
डे हरकती व सूचना सादर करता येणार आहे.
तसेच प्रसिध्द करण्यात आलेल्या बीड जिल्ह्याच्या प्रारुप मतदान केंद्राच्या यादीमधील मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीचे नांव, मतदान केंद्राची व्याप्ती इत्यादी बाबत हरकती व सूचना असल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे दिनांक १३ आॅक्टोबर २०२० पूर्वी सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी आवाहन केले आहे.
००००
No comments:
Post a Comment