Wednesday, October 21, 2020

भगवानगडाच्या पायथ्याशी अॕड बाळासाहेब आंबेडकरांचा दसरा मेळावा होणार.


* पंकजा मुंडे कारखानाधार्जिनी भाषा बोलतायत.


बीड (प्रतिनीधी )- वैद्यनाथ कारखाना उभा करण्यासाठी आपले राजकारण साधणार्‍या पंकजा मुंडे या कामगारांच्या मुळावर आहेत. त्यांना त्यांचे राजकारण चालवायचे आहे, म्हणून त्यांनी जरी शरद पवार बोलवतील ती भाषा बोलणार असतील तर आम्ही आमचा संघर्ष म्यान करणार नाहीत. यावर्षी भगवानगडाच्या पायथ्याला बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर मेळावा होणार असल्याची घोषणा बहुजन वंचीतचे प्रा. शिवाजी बांगर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 
    ऊसतोड कामगारांची पंढरी असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याला हा दसरा मेळावा होणार असून नवी रित, नव्या परंपरेने इतरांच्या राजकारणाचा दसरा काढू, असे म्हणत वंचित आघाडीने पंकजा मुंडेंच्या विरोधात राजकीय कोयता उपसला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत वंचितचे प्राध्यापक शिवाजी बांगर यांनी पंकजा मुंडेंवर कडाडून टीका करत ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नापेक्षा कारखानदारांच्या प्रश्‍नांना महत्व देणार्‍या पंकजा मुंडेंविरोधात आक्रमक होत यावर्षी भगवानगडाच्या पायथ्याशी आंबेडकरांच्या उपस्थित दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैद्यनाथसाठी २५ कोटी घेण्यासाठी कघामगारांचा बळी देणार्‍या पंकजा मुंडे यांनी आपले राजकारण व कारखानदारी खुशाल करावी, मात्र त्यासाठी कामगारांचा फड उद्ध्वस्त करण्याचे कारखानेधार्जिने बुजगावणे भूमिका घेऊ नये, असेही ते या वेळी म्हणाले. 

No comments:

Post a Comment