Thursday, October 15, 2020

जिल्ह्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याचे साखर नियतन जाहिर.

बीड,दि. 14 :- (जि.मा.का)  माहे ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 साठी अंत्योदय लाभार्थ्यांकरिता साखर नियतन 983.00 क्किंटल मंजूर केलेले असून साखर वाहतुक पुरवढादार म्हणून गुरू गणेश ट्रेडिंग कंपनी, बीड यांची नियुक्ती केलेली आहे.
माहे ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 साठी बीड जिल्हयातील अंत्योदय कुटुंबातील कार्डधारकांना प्रती कार्ड 1 किलो या परिमाणात साखर वितरणासाठी 965.50 क्विंटल नियतन तालुकानिहाय खालील प्रमाणे मंजूर करण्यात येत आहे. साखर पुरवठादार गुरु गणेश ट्रेंडिंग कंपनी, बीड यांचे मार्फत जिहयातील तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात खालील प्रमाणे साखर पुरवठा करण्यात येणार आहे.
बीड - 167.50 , शिरुर कासार- 53.00 , अंबाजोगाई - 96.50 , धारुर -71.50, गेवराई- 76.00 , केज-68.50, माजलगाव- 82.50, परळी-82.50 , पाटोदा-57.50, वडवणी- 45.50, आष्टी-94.50.
जिल्हयातील एकूण अंत्योदय अन्न योजनेतील कार्ड धारकांची संख्या 40243 आहे. जिल्हयात माहे सप्टेंबर 2020 अखेर 243.46 क्विंटल साखर शिल्लक असून माहे ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 या तिमाही कालावधीचे मंजूर नियतन 965.50 क्विंटल आहे. माहे ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 एकुण तिमाही कालावधीचे शिल्लके सह मंजूर साखरेचे नियतन 1208.96 क्विंटल आहे.
*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment