Saturday, September 19, 2020

बीडचे नवे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी बीडमध्ये दाखल. बीड पोलिस दलाकडून सलामी.



बीड (प्रतिनीधी )- बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई गुप्तचर विभागाचे उपायुक्त राजा रामास्वामी हे बीडचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून बीड शहरात डेरेदाखल झाले असून आज दुपारी त्यांना बीड पोलिस दलाने सलामी देत स्वागत केले. बातमी लिहिपर्यंत बीड जिल्हा पोलिस अधीक्षक म्जहणून चार्ज घेण्याची प्रक्रिया सुरू होती. आता राजा रामास्वामी यांच्या कामगिरीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 
    तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची कामगिरी कौतुकास्पद मानली जात होती. परवा रात्री हर्ष पोद्दार यांची बदली होऊन बीडचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मुंबई गुप्तचर विभागाचे उपायुक्त राजा रामास्वामी यांचे नाव समोर आले.आज सकाळी राजा रामास्वामी बीड शहरात डेरेदाखल झाले. बीड जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून ते आज चार्ज घेणार आहेत. आज दुपारी एकच्या नंतर बीड पोलिस दलाने नूतन एसपी राजा रामास्वामी यांना सलामी देत त्यांचे स्वागत केले. राजा रामास्वामी हे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था हाताळताना राजा रामास्वामी काय निर्णय घेतील याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा यासह अन्य अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ते काय उपाययोजना करतील याकडेही आता सर्वांचे लक्ष असून बातमी लिहिपर्यंत बीड जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून राजा रामास्वामी यांनी चार्ज घेतलेला नव्हता. त्याची प्रक्रिया मात्र सुरू होती. राजा रामास्वामी हे २०१२ बॅचचे असून त्यांची कारकिर्दही चांगली आहे.  

सलामी देणार्‍या सहा कर्मचार्‍यांना नवीन एसपींकडून रिवॉर्ड
जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून आलेले राजा रामास्वामी यांनी आज पदभार घेतला. तत्पूर्वी त्यांना जुने एसपी ऑफीस (बिंदुसरा विश्रामगृह) या ठिकाणी सलामी देण्यात आली. सलामी देणार्‍या आरएसआय एस.एस. चव्हाण, बी.एफ.दोडके, के.जी. पवार, एस.ई.राख, बी.आर. घुले, एस.ई. गायकवाड या सहा कर्मचार्‍यांना त्यांनी रिवॉर्ड घोषीत केले.

No comments:

Post a Comment