मुंबई - रात्री पावणेबाराच्या सुमारास मुंबईमधील आकाशवाणी समोर असलेल्या आमदार निवास बॉम्बने उडवून देऊ, असा अज्ञात फोन कॉल आला. या अज्ञात फोनमुळे यंत्रनेची झोपच उडाली. या घटनेची माहिती तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि बॉम्ब स्क्वाडला दिली. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब स्क्वाडने आमदार निवासकडे धाव घेतली.
मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात अज्ञात नंबरवरून फोनो आला. पुढच्या पाच मिनीटांत आमदार निवास उडवणार, असा अज्ञात फोनमधील व्यक्तीने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब स्क्वाड कामाला लागले. त्यांनी सर्वांना आमदार निवासमधून बाहेर काढले आणि श्वान पथकासह इमारतीमधील प्रत्येक खोलीची तापसणी केली. तसेच आजूबाजूच्या परिसराचीही तपासणी करण्यात आली. परंतु या शोध मोहिमेत बॉम्ब सापडला नसल्याची माहिती मिळाली.
हा फोन केवळ दिशाभूल करणारा होता, अशी माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. परंतु हा फोन कुणी केला त्या व्यक्तीचा नंबर ट्रेस केला असून त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
No comments:
Post a Comment