Saturday, September 5, 2020

परळी नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांच्याकडे.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) ;- परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची तब्येत ठिक नसल्यामुळे  वैद्यकीय अर्जित रजेवर गेल्याने परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रभारी पदाचा अतिरिक्त प्रभार येथील नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी सोपवला आहे.

परळी नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रभार नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांच्याकडे देण्यात आल्याचे आदेशात नमुद करण्यात आले असुन मुख्याधिकारी अरविंद मुंडे हे नांदेड येथे उपचारासाठी गेले आहेत.श्री बाबुराव रुपनर यांनी कालच पदभार स्वीकारला असून कामकाज सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment