बीड (प्रतिनिधी ) इतर मागास प्रवर्गातील होतकरू लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांचे अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात येते या योजना ऑनलाईन असून www.msobcfdc.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करावी .
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय बीड मार्फत बीड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील होतकरू लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात येते सन 2020 --21 या आर्थिक वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प रक्कम रुपये 2.50 (अडीच) लक्ष रुपये पर्यंत २७ भौतिक उद्दिष्ट देण्यात आले असून थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रकल्प रक्कम एक लाख पर्यंत १०० भौतिक उद्दिष्ट देण्यात आले आहे . तसेच दहा लक्ष पर्यंतचे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 50 उद्दिष्ट आहे. १० ते ५० लक्ष रुपये पर्यंत गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 12 भौतिक उद्दिष्ट देण्यात आले आहेत पात्र ओबीसी प्रवर्गातील गरजूंनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन एस. आर. गुठे , जिल्हा व्यवस्थापक बीड यांनी केले आहे
No comments:
Post a Comment