परळी वैजनाथ ; (प्रतिनिधी) केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ त्वरित कांदा निर्यातीवरील निर्बंध हटविण्यास संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ना .बाळासाहेब थोरात अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार परळी शहर काँग्रेस कमिटी व सर्व काँग्रेस विभागाच्यावतीने परळी तहसीलदार यांना केंद्रसरकारने कांद्यावरील निर्यात बंदी घातली आहे व शेतकऱ्यांच्या शेतीमालावर जीएसटी कर लावला आहे. तो रद्द करण्यासंदर्भात मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना तहसीलदार परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे. या जनआंदोलनात काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत कोरे बाबुभाई नंबरदार परळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवक्ता काँग्रेस कमिटी ॲड संजय रोडे कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अल्ताफ अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद भाई शहराध्यक्ष शेख सिकंदर महिला तालुकाध्यक्ष सुनिता मुंडे परळी महिला काँग्रेस शहराध्यक्ष आशाताई कोरे असंघटित कामगार जब्बार शेठ राम घाटे शेख अलीम दगडोबा कराड शेख शारेख राहुल भोकरे इत्यादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment