Tuesday, September 15, 2020

तेलगावची विजया बँक अज्ञात चोरट्यांनी फोडली.



किल्लेधारूर दि.१५(प्रतिनीधी ) तालुक्यातील तेलगाव कारखाना परिसरात असलेली विजया बँक अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री फोडल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना परिसरात विजया बँक आहे. या बँकेच्या जवळच माँ वैष्णवीदेवी मंदिर आहे. या बँकेत तेलगाव कारखाना परिसर, तेलगाव, कारी आदी भागातील शेत उत्पादक शेतकऱ्यांसह अनेक व्यवसायिक व जनतेची खाती आहेत. सोमवारी रात्री या बँकेच्या भिंतीमधील खिडकीला लावलेली लोखंडी  जाळी तोडून काचेची खिडकी फोडत अज्ञात चोरट्यांनी बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याचे सकाळी निदर्शनास आले. यामुळे याभागात खळबळ माजली असुन दिंद्रुड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिस तपासात चोरी झाली का? झाली तर किती झाली आदी बाबी स्पष्ट होतील

No comments:

Post a Comment