
अंबाजोगाई (प्रतिनीधी )- अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्स वसतिगृहातील सहा नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे रिपोर्ट काल रात्री प्राप्त झाल्याने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे तर एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आज पाहाटे त्यांचे कोविड कक्षात निधन झाल्याची घटना घडली आहे
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाने प्रचंड गती घेत धुमाकूळ घातला आहे दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे रिपोर्ट प्रशासना कडून येत आहेत मात्र हलगर्जीपणा दाखवत नागरिक विना मास्क फिरणे नाहक गर्दी करणे सर्व प्रकारच्या दुकाने वेळे पेक्षा जास्त वेळ उघडी राहणे आदी प्रकार शहरात सुरु असल्याने कोरोनाची साखळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे त्यातच अनेकवेळा लॉक डाऊन करून सुद्धा जास्त प्रमाणात कोरोनाची साखळी तुटू शकली नाही म्हणून शासन सध्या लॉकडाऊन करण्याच्या मनस्थिती नाही जर कोरोनाची गती अशीच कायम राहिली तर येत्या दोन महिन्यात शहरात विद्रुप परिस्थिती निर्माण होऊन कोणतीही यंत्रणा काहीच करू शकणार नाही असे मत अनेक डॉक्टर व्यक्त करू लागले आहेत स्वा रा ती रुग्णालयात डॉक्टर नर्स वर्ग चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे काल रात्री नर्स हॉस्टेल मधील सहा नर्स कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर शहरातील एक पत्रकार तीन चार दिवसा पासून सर्दी तापीने आजारी पडले असता त्यांना रात्री स्वा रा ती मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना कोविड कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आज पहाटे त्यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे
No comments:
Post a Comment