Wednesday, September 30, 2020

जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा (क्रॉप पॅटर्न) लवकरात लवकर तयार करावा - जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड,  दि. ३० :--जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा पीक आराखडा (क्रॉप पॅटर्न) लवकरात लवकर तयार केला जावा यासाठी सुरू असलेले सर्वेक्षण गतीने पूर्ण करण्यात यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत कृती आराखडा याबाबत बैठक श्री रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते
जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, क्रॉप पॅटर्न तयार करताना सदर गावांमध्ये होणारे कृषी उत्पादन त्यांचे प्रकार एकूण उत्पादन हंगामनिहाय घेण्यात येणारे पीक पद्धती यांची माहिती असावी जिल्ह्यातील हा क्रॉप पॅटर्न तयार झाल्यानंतर याचा उपयोग शेतकऱ्यांना आणि आणि कृषीमाल खरेदी करणाऱ्या कृषी आधारित उद्योगांना होईल आवश्यक दर्जा आणि होणारे पीक उत्पादन याची माहिती मिळाल्यामुळे कृषी मालाला अधिक दर मिळू लागेल या क्रॉप पॅटर्न ची माहिती वेबसाईट द्वारे आणि पुस्तिके द्वारे उपलब्ध करून देता येईल.
ते म्हणाले सेंद्रिय शेती कडे वाटचाल करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात यावे यासाठी प्रशिक्षण दिल्यानंतर त्याची परिणामकारकता तपासली जावी याचा उपयोग सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी गटांना देण्यात येणारा प्रशिक्षण दर्जा सुधारण्यासाठी करण्यात येईल करता येईल या प्रशिक्षणामध्ये व्हिडिओ क्लिप्स तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुलभ व सोपे करण्याचा प्रयत्न केला जावा असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले
याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक डी.जी. मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.  बैठकीमध्ये  जिल्ह्यातील  कृषी विकासासाठी  राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या  बाबत  चर्चा करण्यात आली .
 प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना अंतर्गत जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्या साठी मोठी संधी असून याचा उपयोग शेतकरी गटांना मोठ्या प्रमाणात मिळू शकेल यासाठी प्राधान्यक्रमाने जिल्ह्यातील कृषी उत्पादनाचा विचार करता सोयाबीन , सिताफळ व पेरू या वर प्रक्रिया करणाऱ्या या उद्योगात बाबत माहिती जिल्हा मार्फत राज्य कृषी आयुक्तालय आणि केंद्र सरकारकडे सादर केली जाणार आहे
तसेच यावेळी आत्माच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारे उपक्रम प्रशिक्षणे योजनांची अंमलबजावणी आदींची माहिती सादर करण्यात आली. पन्नास शेतकऱ्याचा गट निर्माण करून या गटाद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या कडून वापर करत असलेल्या रासायनिक खत व निविष्ठांच्या उपयोगित शेतीचे रूपांतर टप्प्याटप्प्याने तीन वर्षानंतर पूर्ण पर्यंत पणे ऑरगॅनिक सेंद्रिय शेतीमध्ये होण्यास मदत होते यासाठी शासनाच्या योजनेतून विविध प्रकारचे अर्थसाहाय्य तज्ञाद्वारे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. 
जिल्ह्यातील शेतीमध्ये कुशल शेतमजूर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचा देखील कार्यक्रम आत्मा च्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असून यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये 660 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे दुसऱ्या टप्प्यात सध्या चालू असलेल्या प्रशिक्षणात 30 सप्टेंबर पर्यंत अजून 550 व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाईल यामुळे शेतीसाठी देखील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे अशी माहिती श्री मुळे यांनी दिली.
०००००

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परीसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी.

बीड, दि,30 :- (जि.मा.का.) शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET 2020 परीक्षा बीड शहरातील एकुण 02 परीक्षा केंद्रामध्ये दि.01 ऑक्टोबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत दोन क्षेत्रात घेण्याचे निश्चित झाल्याचे कळविलेले आहे.
सदर परीक्षेच्या वेळी परीक्षार्थीसोबत त्यांचे नातेवाईक, मित्र व हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परिसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असे प्रसंग उद्भवल्यास केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पाडणे अडचणीचे होईल.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET 2020 परीक्षा ही बीड शहरात दि. 01 ऑक्टोबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत दोन क्षेत्रात यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्नीक कॉलेज, बार्शी रोड, बीड व गव्हरमेंट पॉलीटेक्नीक कॉलेज पिंपळनेर रोड, बीड या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
उक्त परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यव्यस्था आबाधित रहावी व अनधिकृत कृत्ये होऊ नये या करीता फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये परीक्षा केंद्राच्या 100 मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी,कर्मचारी, परिक्षार्थी यांचे व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात फोटोकॉपी, ई-मेल,इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश, कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेसट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास तसेच झेरॉक्स,एस.टी.डी. मशीन चालू ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे असे नामदेव टिळेकर, उपविभागीय अधिकारी,बीड यांनी कळविले आहे.
*-*-*-*-*-*-*

उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांची फेरनियुक्ती निर्णयाविरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न.

 बीड (प्रतिनिधी) उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक 10:09 2020 च्या पत्रकान्वये पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश आल्यामुळे सद्यस्थितीत राज्यभरातील पाचशेहून अधिक अधिकारी कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली असून उर्वरित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीतही नजीकच्या काळात ही वेळ येण्याची शक्यता आहे यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना समावेश आहे उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील गरिबातील गरीब कुटुंबांना स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम सुरू असून स्वयंसहायता समूह ग्राम संघ व प्रभाग संघ अशी त्रिस्तरीय संस्थेने बांधणी करून या संस्थांच्या माध्यमातून लक्ष घटकांना कुटुंबांना सामाजिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम 2011 पासून सुरू आहे उमेद ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या 10:09 2020 रोजी च्या आदेशानुसार अभियानामध्ये कार्य कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत घेतलेला निर्णय हा या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा आता तात्काळ व नजीकच्या 12 महिन्याच्या काळात खंडित करणार आहेत सदर निर्णय जसा या मागील आठ वर्षांपासून कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वैयक्तिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक व एकूणच भविष्यातील वाटचाल विपरीत परिणाम करणारा आहे तसेच तो गरिबांच्या उभ्या राहिलेल्या समुदाय स्तरीय संस्था म्हणजेच समूह ग्रामसंघ प्रभाग संघ उत्पादन घट कृषी उत्पादन कंपनी व वन स्टेप फॅसिलिटी सेंटर या सर्व संस्थांच्या प्रगतीच्या आड येणार आहे सध्या स्थितीत उभे राहिलेले काम उमेद मध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांची यंत्रणेच्या अनुपस्थित पुढे कसे जाणार हा प्रश्न उद्भवत असून या बाबतीत काय परिस्थिती निर्माण होईल हा खूप चिंतेचा विषय आहे या विषयांमध्ये या संस्थांना आवश्यक ते सुलभीकरण करणे आवश्यक असून त्यासाठी या संस्थेसोबत काम करणारी उमेद अभियानाची कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यंत्रणा सोबत असणे गरजेचे आहे ज्या संस्था या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी औरंबाद घेऊन वेदांगी समस्यांना समोरे घेऊन जाऊन आतापर्यंत झालेल्या त्या संस्था आजा स्थितीत वाऱ्यावर सोडून त्याचा अधिकारी करणे रचणे बाहेरचा रस्ता दाखवण्याची जितके संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अन्य करत आहेत तितकेच ते या सर्व समाजशास्त्रीय संस्थेचे हिताच्या आड येणार आहे म्हणून उमेद च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वच कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून जातीय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात ;- पँथर डॉ राजन माकणीकर

* लाखो सह्यांसह मा. राष्ट्रपती यांना शिस्तमंडळ भेटणार.

मुंबई ;-- (प्रतिनिधी) भारतात आरएसएस प्रणित भाजप सरकार सत्तेत आल्यापासून विषमता डोकं वर काढत आहे, उत्तर प्रदेश मध्ये जातीय हिंसाचारात वाढ होऊन रामराज्य मॉडेल सपशेल फेल ठरले आहे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चे सरकार जातीय कारवाया रोखण्यात असमर्थ ठरले असल्यामुळे यूपीत राष्ट्रपती राजवट लागू करावी असे निवेदन भारताचे रात्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांना आरपीआय डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा च्या वतीने राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी इमेल द्वारे केले आहे.
            उत्तर प्रदेश येथे दलित मुस्लिम विरोधी अत्याचार वाढले असून जातीय अराजकता निर्माण झाली आहे, महिला असुरक्षित असून मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटनेट कमालीची वाढ झाली आहे, ही फार शरमेची बाब आहे.
सरकार मध्ये गाय आणि सवर्णांना संरक्षण मिळत असून संविधानाची पायमल्ली होत आहे, जातीचे राजकारण केले जात आहे, आंदोलन करणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यात येऊन गरीबांचा आवाज दाबला जात आहे.
मनुवादी विषमतावादी शक्ती आपले विष पसरवत आहेत.
        आशिफा झाली आता हाथरस येथे मनीषा वाल्मिकी सारख्या दिन व दुबळ्या जातींतील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिने पोलिसात आवाज उठवू नये म्हणून दाताने तीचि जीभ कापून टाकली जात आहे, तरीही मनीषा ने पोलिसात तक्रार केली मात्र पोलीस यंत्रणा कडून तपास ही पक्षपाती होऊन योग्य उपचाराअभावी तिचे मयत झाले भारतीय लोकशाहीला कालिंबा फासणारी ही बाब आहे, तरीही भारतातील मीडिया लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाणारी गोदी, दलाल मीडिया या प्रकरणाकडे कानाडोळा करत असून या घटनेचा रिपाई डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन बलात्कार व जातीय अत्याचारात बळी पडलेल्या मनीषा वाल्मिकी या बहिणीस आदरांजली अर्पण करून राष्ट्रपती महोदयांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे निवेदनात डॉ माकणीकर यांनी म्हटले आहे. 
  उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू कारावी.
दलित मुस्लिम अत्याचाराच्या प्रश्नावर देशातील सर्व सरकारने कठोर भूमिका घ्यावी.मनीषा वाल्मिकी सह सर्वच जातीय अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे चालवावेत.
सर्व जातीच्या महिलांना योग्य संरक्षण मिळावे असे शासन व पोलीस यंत्रणा मजबूत करावी.
मनीषा वाल्मिकी च्या वासनांध मनुवादी नराधमांना भर चौकात फाशी द्यावी. अश्या स्वरूपाच्या मागण्या डेमोक्रॅटिक आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धाचे संस्थापक महासचिव डॉ राजन माकनीकर यांनी केल्या आहेत.
ईमेल केलेल्या निवेदनावर सम्यक पँथर व आरपीआय पक्षाच्या प्रमुखासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष पँथर श्रावण गायकवाड, शिवाभाई राठोड यांची नावे आहेत.
       जातीय हिंसाचार व अत्याचार प्रकरण जर थांबले नाहीत तर पुज्य भदंत शिलबोधी व युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात देशभरात "योगी हटाव युपी बचाव" असा हॅशटॅग वापरून स्वाक्षरी अभियान चालू करणार असून मा राष्ट्रपती यांची वेळ निश्चित करून प्रत्यक्ष लाखो स्वाक्षरीनिशी पूज्य भदंत शिलबोधी व कनिष्क कांबळे यांच्या शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती डॉ माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय. कोणत्या पक्षात जाणार ?


मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्याची एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांनी लवकरच पक्ष सोडणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतचा संभ्रम असून या क्लिपमध्ये त्यांनी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला नाही. तर पदाबाबत बोलणी सुरु असल्याची माहिती आहे.

या क्लिपमध्ये खडसे यांच्या कार्यकर्त्यानं आपला काहीतरी निर्णय घ्या, आतापण भाजपनं तुम्हाला काही नाही दिलं. पुन्हा एकदा तुम्हाला डावलण्यात आलं आहे. त्यावर एकनाथ खडसे त्या कार्यकर्त्याला उद्या जायचं ठरलं असल्याचं म्हटलं आहे. भाऊ आता पण त्यांनी तुम्हाला डावललं, आम्ही खूप नाराज आहोत. त्यामुळे तुम्ही काही तरी निर्णय घ्या असं कार्यकर्ता त्यांना म्हणाला त्यावर खडसे यांनी अरे जाणार आहे, पण शेवटी पद-बिद काहीतरी ठरलं पाहिजे की नाही असं म्हटलं आहे. यावरुन खडसे लवकरच भाजपमधून पडणार असल्याचं दिसत आहे. याबाबतची बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे

एल.सी.बी.ची कारवाई चोरीचा आरोपी चोवीस तासात जेरबंद.


नेकनूर (प्रतिनीधी )- चौसाळा येथील एका ऍग्रो एजन्सीमध्ये चोरी करून चोरट्यांनी दुकानातील पावणे तीन लाख रुपये चोरून नेले होते. या चोरी प्रकरणाचा तपास एलसीबीने २४ तासांच्या आत लावला. काल दुपारी या प्रकरणातील चोरट्यास ढोकी येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. 
   चौसाळा येथील शशिकांत खोड यांच्या जगदंबा ऍग्रो एजन्सीमध्ये परवा रात्री चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चोरीचा तपास एलसीबीने लावला. चोरटा उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एलसीबीच्या टिमने सदरील चोरटा अशोक दिलीप कळसकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपये जप्त केले. ही कारवाई पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद जगताप, श्रीमंत उबाळे, राहुल शिंदे, चालक जाधव यांनी केली. या चोरट्यास नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जाधव हे करत आहेत. 


पोलीस अधीक्षकाचा आदेश आला.आणी पकडला हातभट्टीवाला अवैध दारूवाला.जिल्ह्यातील वाळू, राशन माफियांसह पत्त्याचे क्लब, मटक्याच्या धंद्याचे काय ?



बीड (प्रतिनीधी )- नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या अवैध धंद्यांवरील आदेशानंतर ठाणेप्रमुखांनी एसपींना खुश करण्या इरादे थातूरमातूर कारवाया करत जिल्ह्यात जे प्रमुख अवैध धंदे आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून भर पावसाळ्यात वाळु माफिया वाळुची तस्करी करताना दिसून येत आहेत तर मटका, पत्त्याचे क्लब यासारखे धंदे आजही तेजीत आहेत. राशन माफियासह आयपीएलचा सट्टाही जिल्ह्यात जोर धरून आहे. याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होत असल्याने हजार-पाचशेचा हप्ता बंद परंतु पाच-पन्नास हजाराचा हप्ता मात्र सुरू असल्याने केवळ हातभट्टी चालकांवर थातूरमातूर कारवाई  होताना दिसून येते. 
    जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून चार्ज घेताच जिल्ह्यातले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे थातूरमातूर काम जिल्हाभरातून करण्यात येऊ लागले. केवळ हातभट्टी दारू आणि अवैध दारू विक्रेत्यांना पकडून आणत त्यांच्यावर केसेस करून आपल्या हद्दीत एवढेच अवैध धंदे आहेत हे दाखवण्याचा प्रयास केला मात्र जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मटका, जुगार सर्रासपणे सुरू आहे. पत्त्याचे क्लब ठिकठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातील माफियागिरी सर्रासपणे सुरू आहे. भर पावसाळ्यात वाळुची तस्करी ठिकठिकारी होताना दिसून येते. छोट्या - मोठ्या नदी पात्रात पाणी असताना वाळु येते कुठून? हा प्रश्‍न उपस्थित होतो तेव्हा मापियांनी मोठ्या प्रमाणावर वाळुची साठेबाजी केल्याचे उघडकीस येते. मात्र पोलिस यंत्रणेला हे वाळुचे साठे सापडत नाहीत. राशन माफियांच्या गाड्याही पोलिसांना मिळून येत नाहीत. वरिष्ठ अधिकार्‍यांनी आदेश दिला म्हणून ठाणे प्रमुखांनी ठाण्यात बसून हातभट्टीसह अवैध दारू विक्रेत्यांना भ्रमणध्वनी करून पोलिस ठाण्यात बोलवून घेतले आणि केसेस केल्या. एखाद-दुसरी कारवाई ही थेट घटनास्थळाची पहावयास मिळाली. अवैध धंदे बंद करायचे असतील तर बीडची माफियागिरी बंद झाली पाहिजे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे. 

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी जप्त केलेल्या २६ लाखाच्या गुटख्याची केली होळी.



नेकनूर (प्रतिनीधी )- गेल्या काही दिवसांपूर्वी नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कंटेनरमध्ये २६ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या गुटख्याची होळी आज अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी केली. हा जप्त केलेला गुटखा कमलापसंद पानमसाला होता. 
   कंटेनर (क्र. एच.आर.८४-७८८८) या गाडीत गुटखा पकडण्यात आला होता. या गुटख्याची किंमत २६ लाख ७४ हजार ८२४ इतकी होती. जप्त केलेला गुटखा आज नेकनूरपासून ३ कि.मी. अंतरावर जाळण्यात आला. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सय्यद इमरान हाशमी, भिसे अनिकेत, महारेवार ऋषिकेश, मुख्तार शेख, नेकनूर ठाण्याचे केंद्रेंसह आदी कर्मचारी व इतरांच्या उपस्थितीत गुटख्याची होळी करण्यात आली. 

Tuesday, September 29, 2020

स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कारवाई करा - धनंजय मुंडे


* ऊसतोड कामगारांची नोंदणी व अन्य प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्याचे निर्देश.

* राज्य शासन स्तरावर बैठका व हालचालींना वेग.

मुंबई (दि. २९) ---- : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादी आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करावी. प्राथमिक स्तरावर ऊसतोड कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया येत्या काही दिवसातच सुरू करण्यात यावी यासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. या बैठकीस आ. संजय दौंड, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टी चे महासंचालक धम्मजित गजभिये, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री. जोशी, कामगार विभागाचे उपसचिव, सहकार विभागाचे उपसचिव श्री. घाडगे, साखर आयुक्तालयाचे संचालक श्री. उत्तम इंदलकर, यांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

उसतोडणीचा हंगाम येत्या काही दिवसात सुरू होत असून, कामगारांची शासनाकडे नोंद करून त्यांना ओळखपत्र देणे, आरोग्य तपासणी करणे तसेच ऊसतोड कामगार व त्यांच्या पशूंना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करण्यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली.

महामंडळाच्या माध्यमातून 'कंपनी कायद्याच्या' अंतर्गत ऊसतोड मजुरांची नोंदणी 15 दिवसात करण्याचे निर्देश यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी दिले.

महामंडळाची रचना कशी असावी, घटना, आकृतीबंध तयार करणे, महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, महामंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी या सर्वच विषयांची चर्चा या बैठकीत झाली.

उसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी व त्यांच्या कौटुंबिक सुरक्षेसाठी महामंडळाच्या माध्यमातून काही कल्याणकारी योजना राबविण्याचा आपला मानस असून यासाठी त्याद्वारे निधी उभा करण्यासाठी सहकार विभागासोबत चर्चा सुरू असल्याचे यावेळी ना. मुंडे म्हणाले. 

अर्थसंकल्पातील तरतुदी प्रमाणे महामंडळासाठी निधी उभा करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असून, ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कायदा लागू करण्यासाठीही आपण पाठपुरावा करणार असल्याचे ना. मुंडे म्हणाले.

विभागाचे अधिकारी यांच्यासह, साखर कारखाना प्रतिनिधी, प्रत्यक्ष ऊसतोड कामगार, मुकादम व विविध संघटना यांचे प्रतिनिधी यांना महामंडळ व घटना समिती मध्ये स्थान द्यावे, महामंडळ स्थापनेमध्ये त्यांना विश्वासात घ्यावे अशा सूचना यावेळी ना. मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ज्या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांची संख्या सर्वाधिक आहे, असे पाच तालुके निवडून तेथे ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी स्वतंत्र पाच निवासी शाळा उभ्या करणार असून, याद्वारे मुलींना मोफत शिक्षण व सामाजिक सुरक्षा उपलब्ध करू यासाठी निधी व अन्य बाबी उभ्या करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली असल्याचेही यावेळी ना. मुंडे म्हणाले.

पाच मिनीटांत आमदार निवास बॉम्बने उडवणार.असा अज्ञात फोन येताच प्रशासन यंत्रनेची उडाली धावपळ .

मुंबई - रात्री पावणेबाराच्या सुमारास मुंबईमधील आकाशवाणी समोर असलेल्या आमदार निवास बॉम्बने उडवून देऊ, असा अज्ञात फोन कॉल आला. या अज्ञात फोनमुळे यंत्रनेची झोपच उडाली. या घटनेची माहिती तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि बॉम्ब स्क्वाडला दिली. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब स्क्वाडने आमदार निवासकडे धाव घेतली.

मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात अज्ञात नंबरवरून फोनो आला. पुढच्या पाच मिनीटांत आमदार निवास उडवणार, असा अज्ञात फोनमधील व्यक्तीने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब स्क्वाड कामाला लागले. त्यांनी सर्वांना आमदार निवासमधून बाहेर काढले आणि श्वान पथकासह इमारतीमधील प्रत्येक खोलीची तापसणी केली. तसेच आजूबाजूच्या परिसराचीही तपासणी करण्यात आली. परंतु या शोध मोहिमेत बॉम्ब सापडला नसल्याची माहिती मिळाली.

हा फोन केवळ दिशाभूल करणारा होता, अशी माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. परंतु हा फोन कुणी केला त्या व्यक्तीचा नंबर ट्रेस केला असून त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 14 दिवस राबविण्यात आली निर्जुतीकरण मोहिम.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहर आणि तालुक्यात सुरू झालेली निर्जुंतीकरण (जंतुनाशक) फवारणी सलग 14 दिवस चालली असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या माध्यमातून कोरोना योद्धा होत अनेक गाव व शहराच्या काना कोपऱ्यात फवारणीच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांना सहकार्य केले आहे.
वाढदिवसानिमित्त नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबविण्याची व जनतेला सहकार्य होईल असे काम करण्याची चांगली परंपरा जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जपली आहे. 5 सप्टेंबरला बबनभाऊ गित्ते यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केल्यानंतर परळी शहर आणि तालुक्यातील सुमारे 50 पेक्षा अधिक गावात सार्वजनिक स्थळी जनक्रांती सेनेच्या वतिने निर्जुंतीकरण मोहीम राबविण्यात आली. ट्रॅक्टर किंवा मिळेल त्या वाहनाच्या माध्यमातून जनक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात निर्जुतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी गाव मोठे असल्याने सलग दोन दिवस मोहिम त्या ठिकाणी राबविण्यात आली. 
परळी शहरात मोंढा, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणासह परळी शहरानजीक असलेल्या गाव आणि वस्ती परिसरातही निर्जुतुकीकरण करण्यात आले. जनक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी राबविलेल्या आगळया वेगळया व तेवढ्याच उपयुक्त असलेल्या औषध फवारणीच्या या मोहिमेचे मनापासून स्वागत करीत त्यंाचे आभार व्यक्त केले. 

*चांगली परंपरा*
बबनभाऊ गित्ते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष असून वाढदिवस किंवा इतर महत्वाच्या दिवसानिमित्त लोकोउपयोगी उपक्रम राबविण्याची त्यांची परंपरा आहे. कोरोना लॉकडाऊन कालावधीत अनेक ठिकाणी गरजूंना अन्नधान्य देण्यात आले असून कोरोनाचा अटकाव करण्यासाठी गावस्तरावर चांगली स्वच्छता मोहीम व तेथे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होवू नये यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले. निर्जुंतीकरण मोहिमेत सलग 14 दिवस शेकडो कार्यकर्ते मनापासून सक्रीय सहभागी झाले होते. बबनभाऊ गित्ते यांनी एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून चांगली परंपरा सर्वांसमोर ठेवली आहे.

रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी अंतिम निर्णय लवकरच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.


मुंबई :-  राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी  राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटते. आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते एकेक सुरु करत आहोत. काही व्यवहार बंद ठेवल्याने कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे.  या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.

* माझे कुटुंब माझी जबाबदारी… तशीच तुमचीही…

राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे.कोविडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

* जीवनशैलीत बदल करणे आवश्यक.

आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी टाळणे गरजेचे आहे. लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोनासोबत जगताना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे.  मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

* एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करा.

या विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो हे गंभीर असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचे सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलिप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते

विकासाच्या नावाखाली क्षीरसागररांनी बीडकरांचे हाल केले, रस्त्यांच्या पाहणीवेळी आमदार मेटेंची टीका .

बीड - बीडला अक्षरशः चिखलाचे शहर क्षीरसागर कुटुंबीयांनी बनवून टाकले आहे. आपआपल्या हिस्स्यासाठी या बंगल्याने बीडकरांचे हाल सुरु केले असल्याचे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीडच्या जनतेशी थेट संवाद साधताना म्हटले आहे. रस्त्याच्या कामात दिरंगाई अन् अडवणुकीच्या बाबतीत अडवलेल्या सर्व ठिकाणी जाऊन आ. मेटे यांनी रस्त्यांची पाहणी करून लोकांची विचारपूस, चौकशी केली.

शिवसंग्रामकडून गेल्या ४ वर्षांपासून जनतेच्या हितासाठी क्षीरसागरांना निर्णय घेण्यास भाग पाडले गेले मात्र आता एकाच घरात सर्व महत्वाची पदे घेऊन क्षीरसागरांचा बंगला बीडकरांचे हाल करू लागला आहे. शहरात विविध ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. ही कामे आज सुरु झालेली नाहीत, दोन वर्षांपासून एकच रस्ता पूर्ण होत नाही. या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. शहरातील रस्त्याची कामे दर्जेदार व तात्काळ कशी होत नाहीत तेच पाहू, शिवसंग्राम तात्काळ व दर्जेदार रस्त्यासाठी आग्रही असेल असे आ. मेटे यांनी आक्रमक होत म्हटले आहे.

महिनो-महिना रस्ते खोदून ठेवण्यात येत आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी आणि सांडपाणी साचत असल्याने लोकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. डेंग्यू अन मलेरीयाचे शेकडो पेशंट कोरोनासोबत वेगवेगळ्या दवाखान्यात पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी संवादादरम्यान मेटे यांच्याकडे आपली कैफीयत मांडत होणाऱ्या त्रासाबाबत आपले गाऱ्हाणे मांडले. नगरपालिकेच्या आणि स्थानिक आमदाराच्या वाट्यामुळे शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः या चुलत्या-पुतण्यांनी वाट लावली आहे. ठिक-ठिकाणच्या कामाच्या देवघेवमुळे त्यांच्यातील होणारे वाद हे काम लांबणीवर पडण्यास कारणीभूत ठरत आहेत. एका क्षीरसागराला दाम मिळाले की काम सुरु होते मात्र दुसर्याला हिस्सा मिळाला नाही की काम बंद होते. या क्षीरसागरांच्या देवघेवीमुळे शहरातील बहुतांश कामे बंद पाडली गेली आहेत. त्यामुळे बीड शहरातील गोरगरीब जनता मात्र यात भरडली जात असल्याचे यावेळी मेटे म्हणाले. 

बीड शहर दौऱ्यावेळी जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, मनोज जाधव, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जाकेर हुसेन, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, मछिंद्र कुटे, विनोद हातागळे, अक्षय माने, किशोर गिराम, इकबाल रेहमान, कुरेशी, अझहर भाई, प्रशांत डोरले, सलमान अली, अनिकेत देशपांडे, हरीश शिंदे, सौरभ तांबे, सुनील धायजे, शकील भाई, विजय सुपेकर, शैलेश सुरवसे आदींसह शिवसंग्राम कार्यकर्ते, पदाध{कारी, ठिकठिकाणचे बीडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Sunday, September 27, 2020

न्यु हायस्कुल थर्मल परळी येथील सहशिक्षक अनंत देशमुख यांचे दुःखद निधन .

 परळी वैजनाथ (प्रतिनीधी) - येथील  न्यू हायस्कूल थर्मल परळी येथील सहशिक्षक  अनंत बालासाहेब देशमुख (मोहेकर) हे कोविड 19 साठी पंचायत समिती परळी येथे आरोग्य विभागात कर्तव्य बजावत असताना दि.12.9.20 रोजी *कोरोना बाधित* आढळल्याने अश्विनी हाॅस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी ऍडमिट झाले व उपचार सुरू असतानाच दि.26.9.20 शनिवार रोजी संध्याकाळी 8.00 च्या दरम्यान दुःखद निधन झाले. 
       परिवारातील जबाबदार अशा सरांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला.
या तीव्र दुःखातून सावरण्याची शक्ती देशमुख परिवाराला देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
         या  दुःखात राष्ट्रवादी शिक्षक संघटना सहभागी आहे. कर्तव्य बजावत असताना करोनाची बाधा झाल्यामुळे शिक्षण विभाग व शासनाने याची दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. कांतीकारी साथी परिवार देशमुख यांच्या दुःखत सहभागी आहे.

काकु नाना आडत मार्केट मधील वाकलेल्या पोलमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता.

 

बीड (प्रतिनिधी) - काकू नाना आडत मार्केट मधील दररोज वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिक त्रस्त आहेत व आज या ठिकाणी विद्युत पोल ची अवस्था खूपच बिकट झाली असून या ठिकाणी या वाकलेल्या पोल मुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

काकू नाना आवडत मार्केटमधील दररोज कितीतरी शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी बाहेरगावावरून येतात व किती तरी किरकोळ व्यापारी सुद्धा या ठिकाणी मालवा घेण्यासाठी येत असतात अडत मार्केटमधील वाकलेल्या पोल वरून  विद्युत् प्रवाह करणारी तार आहे व जर वादळी वारा जोराचा आला तर यामुळे पोल खाली पडुन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे तरी महावितरण विभागाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारूच्या 550 बाटल्या पकडल्या.


बीड (प्रतिनीधी )- दारुची अवैध विक्री करण्यासाठी स्कुटीमध्ये दारू घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्कुटीसह दोन इसमांना ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून देशी दारूच्या 550 बाटल्या ताब्यात घेतल्या. ही कारवाई काल बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. 
   दारूची अवैध विक्री करण्यासाठी अशोक प्रकाश लोकरे (रा. काळा हनुमान ठाणा, पेठ बीड) व अनिल मधुकर तांगडे (रा. शिंदेनगर बीड) हे दोघे एका स्कुटीवर अवैध देशी दारू घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून देशी दारूच्या 550 बाटल्या (किंमत 14300) व स्कूटी ताब्यात घेऊन त्यांच्यावर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई  वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गु. शा. चे पोलिस निरीक्षक भारत राऊत, सपोनि. विजय गोसावी, श्रीमंत उबाळे, हनुमंत खेडकर, युनुस बागवान, तांदळे यांनी केली

निलंबीत मुख्याध्यपिकेने सहा महिन्यानंतर केला संस्था चालका -विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.



बीड (प्रतिनीधी )- संस्था चालक आणि बडतर्फ मुख्याध्यापिका यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद विवाद सुरू होता. या प्रकरणी विनयभंगाची तक्रार मुख्याध्यापिकेने शिवाजीनगर पोलिसांकडे दिली होती. ही तक्रार 20 फेब्रुवारी 2020 रोजी दिली होती. सहा महिन्यानंतर रात्री संस्था चालकासह सचिवाविरोधात 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शिवनेरी प्राथमिक विद्यालयामध्ये कार्यरत असणार्‍या मुख्याध्यापिकेस काही महिन्यांपूर्वी निलंबीत करण्यात आले होते. या निलंबणाच्या विरोधात सदरील मुख्याध्यापिका न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला होता. यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती.  संस्था चालक व सचिवांनी आपणास शिवीगाळ करत विनयभंग केल्याची तक्रार मुख्याध्यापिकेने 20 फेब्रुवारी 2020 रोजी दिली होती. तेव्हापासून संस्था चालक आणि मुख्याध्यापिका यांच्यात वादविवाद सुरू होते. काल रात्री या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोहन सिरसट व विवेक सिरसट यांच्या विरोधात कलम 354 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

बीड येथील कंकालेश्‍वर कुंडात इसमाचा मृतदेह आढळला.


बीड (प्रतिनीधी ):- शहरातील कंकालेश्‍वर कुंडात एका 44 वर्षीय इसमाचा मृतदेह आज सकाळी 8.30 वाजता आढळून आल्यानंतर घटनास्थळी पेठ बीड पोलीसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला. 
बाळासाहेब विनायकराव ढेरे (वय 44 वर्षे रा.धांडे गल्ली बीड) यांचा आज सकाळी 8.30 वाजता कंकालेश्‍वर कुंडात मृतदेह तरंगतांना येथील नागरिकांना दिसला. याची माहिती बीड ग्रामिण पोलीसांना दिल्यानंतर घटनास्थळी एपीआय बासरवाल, हे.काँ.जाधव, खाडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कुंडाबाहेर काढुन तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला. मयत ढेरे यांनी आत्महत्या केली की घातपात आहे या प्रकरणाचा पेठ बीड पोलीस तपास करत आहेत. 
 

पोहनेर येथील गोदावरी नदीला पुर.पाच गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.


परळी वैजनाथ ( प्रतिनीधी )-परळी तालुक्यातील पोहनेरच्या गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर,डिग्रस,तेलसमुख,बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसापासुन मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे तारवण,माजलगाव ढालेगाव अदी प्रकल्प भरली आहेत.तारवण तलावाचे 17 दरवाजे,माजलगावचे 3 दरवाजे व ढालेगाव प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत.यामुळे गोदावरी नदी दोतोंडी वाहत असल्यामुळे परळी तालुक्यातील पोहनेरच्या गोदावरी नदीला पुर आल्याने पोहनेर,डिग्रस,तेलसमुख,बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतिने सतर्कतेच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
शनिवारी वरील प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे पोहनेर येथील गोदावरीला पुर आल्याने पुलाला पाणी लागले आहे.प्रशासनाकडुन महसुल इरिकेशन,पोलीस व गावातील नागरिक मिळुन सतर्कतेसाठी पथक तयार करण्यात आले आहे.पोहनेर,डिग्रस,तेलसमुख,बोरखेड व ममदापुर गावच्या नागरिकांनी सतर्क राहुन प्रशासनाच्या वतिने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.अण्णासाहेब पाटील यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन.

===============
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष,माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलीदान देणारे कै.आ.अण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त शुक्रवार,दिनांक 25 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. 
अंबाजोगाई शहरातील कै.अण्णासाहेब पाटील चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,शेख मुख्तार,काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिनेश घोडके,माऊली वैद्य,सुधाकर टेकाळे,अजीम जरगर,विजय रापतवार,महेश वेदपाठक आदींसहीत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. 


*कै.अण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगारांसाठी आयुष्य समर्पित केले-राजकिशोर मोदी*
===============
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा आरक्षण लढ्याचे जनक म्हणुन ओळखले जाणारे कै.आ.अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.त्यांचे कार्य महाराष्ट्र कदापिही विसरणार नाही.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी व माथाडी कामगारांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे आग्रणी नेते म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते.जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

===============

Saturday, September 26, 2020

भाजपची नवी टीम तयार. एकनाथ खडसेंना पुन्हा डावललं. तर पंकजाताई मुंडे राष्ट्रीय सचिव. राज्यातील या तरुण चेहय्रांना दिली संधी


नवी दिल्ली – भाजपनं नवीन टीम तयार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहय्रांना संधी देण्यात आली आत्रा एकनाथ खडसे यांना मात्र डावललं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

एकूण 13 जणांना राष्ट्रीय सचिव म्हणून नेमण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती.

मात्र आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे. तर विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. तसेच राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांचं देखील नाव आहे. त्यामुळे या यादीवर आता एकनाथ खडसे काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

बीड जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडीसिवर इंजेक्शन किंवा अन्य कोणत्याच बाबींची कमतरता भासणार नाही - मुख्यमंत्र्यांनी दिला मुंडेंना शब्द!



मुंबई (दि. २६) -- : मराठवाड्यातील कोविड परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्स बैठकीत बीड जिल्ह्यातील कोविड विषयक समस्यांकडे आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी ऑक्सिजनचा मागणीनुसार पुरवठा करणे, रेमडीसीवर इंजेक्शनची मुबलक प्रमाणात उपलब्धी यासह कोविड साठी अधिकच्या निधीबाबत सकारात्मक चर्चा झाली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ना. मुंडे हे सह्याद्री अतिथीगृह येथून व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झाले होते, या बैठकीस आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य महत्वाचे अधिकारी उपस्थित होते

बैठकीदरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपाययोजनांचा समग्र आढावा सादर करून जिल्ह्यातील सद्यस्थीतीबाबत मुख्यमंत्री यांना अवगत केले. बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा मागणीपेक्षा काही प्रमाणात कमी असून रेमडीसीवर या महत्त्वाच्या इंजेक्शनचा देखील सध्या तुटवडा जाणवत आहे

फैबीफ्लू सह अन्य औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे यासह अन्य सर्वसमावेशक बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस पालकमंत्री ना. मुंडे यांच्यासह बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार आदी बीड येथून उपस्थित होते

बीड जिल्ह्यातील प्रतिरुग्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेशो हा विभागात अव्वल असून कोरोना मुक्तीचे प्रमाणही ७०% च्या घरात आहे, याबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच कोरोना योध्याचे यावेळी कौतुक केले

येत्या काही दिवसात जिल्हाभरात व राज्यात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात प्रत्येक घटकाने सर्व क्षमतेने आपले योगदान देऊन हे अभियान यशस्वी करावे व कोरोनाला ठरवण्यासाठी सज्ज व्हावे असेही यावेळी श्री. उद्धव ठाकरे म्हणाले

दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमडीसीवर इंजेक्शन व अन्य औषध सामग्री तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले असून बीड जिल्ह्याच्या आरोग्यविषयक योजनांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे म्हणाले.

परळी येथे विनामास्क दुचाकीवर डब्बलसीट टीब्बलसीट फिरनाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई.



परळी वैजनाथ ( प्रतिनीधी) -  परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

नागपूर दिक्षाभूमीवरील यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द - अध्यक्ष. भदंत नागार्जुना



नागपूर | यावर्षी दिक्षाभूमी वरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. कोविड-१९ चा नागपुरात होणारा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती द्वारे या दिक्षाभूमीवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. दिक्षाभूमीवरील येणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या गर्दीमुळे कोरोना संबंधी सूचनांचे पालन करणे जवळपास अशक्य आहे. गर्दीत एखादा लक्षणहीन कोरोना बाधित आल्यास सवय बांधवांचे आरोग्य टाकणे उचित नाही. म्हणून स्मारक समिती सर्व जनतेला आवाहन करते की येणाऱ्या १४ ऑक्टोबर आणि अशोक चक्र विजया दशमी २५ ऑक्टोबर २०२० रोजी आपल्या घरीच बौद्धवंदना व बाबासाहेबांना अभिवादन करतील. दिक्षा भूमीवर दरवर्षीप्रमाणे कोणताच कार्यक्रम होणार नाही व दुकानांना सुद्धा परवानगी देता येणार नाही. आपल्या बांधवांचे आरोग्य लक्षात घेता सहकार्य करावे. यावेळी फक्त स्मारक समितीचे पदाधिकारी शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून व योग्य ती दक्षता घेवून बाबासाहेबांना यथोचित मानवंदना देतील. असे अध्यक्ष आर्या भदंत नागार्जुना शुरेई ससाई, नागपूर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले. 

पंडित दिनदयाळ उपाध्यय यांच्या एकात्म मानवतादातूनच राष्ट्रहित साधले जाईल- नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी.



 

किल्लेधारूर (प्रतिनीधी ) भारतीय जनता पार्टी किल्ले धारूर च्या वतीने कॅ. राजपाल सिंह हजारी इंग्लीश स्कुल, कृषी उत्पन्न बाजार समीती तसेच नगर परिषद कार्यालय येथे एकात्म मानवतावादाचे जनक,प्रखर राष्ट्रभिमानी, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.पंडित दिनदयाजी उपाध्यय यांच्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले

         त्यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी पंडितजी यांच्या जिवन कार्याबद्दल माहीती देऊन राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी एकात्म मानवतावाद व आंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास होत नाही तो पर्यत राष्ट्राची प्रगती होत नाही हे विचार मांडणारे ते विचारवंत होते असे सांगीतले आज आपले लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब त्याच मार्गावर चालत आहेत जनधन योजना, अन्नसुरक्षा, शौच्छालय, प्रधानमंत्री आवास योजना, किसान पेंशन योजना अशा अनेक योजनेद्वारे सामान्य वर्गाला न्याय देण्याचे काम प्रधान मंत्री करत असल्याचे सांगीतले.

या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी साहेब, सभापती महादेव आण्णा बडे, मा. सभापती अर्जुन तिडके,ज्ञानोबा चोले, तालुकाध्यक्ष अॅड.बालासाहेब चोले,नगरसेवक सचिन दुबे,शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश बडे, शहराध्यक्ष अॅड मोहन भोसले, अॅड.नवनाथ पांचाळ महादेव तोंडे,दादा घोळवे यांचे सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे व नगरसेवक सचिन दुबे यांनी परिश्रम घेतले

केंद्रीय उपक्रमांद्वारे बांधलेल्या 72 टक्के शालेय शौचालयांमध्ये पाणीच नाही!


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ मोहिमेला केंद्रीय यंत्रणांनीच हरताळ फासल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय सार्कजनिक क्षेत्रातील सात उपक्रमांद्वारे शाळांसाठी बांधण्यात आलेल्या 72 टक्के शौचालयांमध्ये पाणीच नाही. 33 टक्के शौचालय हे उपयोगात नाहीत तर 55 टक्के ठिकाणी हात धुण्याची सुविधाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती ‘कॅग’च्या अहवालात उघडकीस आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी सर्व शाळांमध्ये एका वर्षाच्या आत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय असावेत अशी घोषणा केली होती. ‘स्वच्छ विद्यालय अभियान’ या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाद्वारे (सीपीएसई) 1,40,997 शौचालये बांधण्यात आली. केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱया एनपीटीसी, पीजीसीआयएल, एनएचपीसी, पीएफसी, आरईसी, ओएनजीसी आणि सीआयएल यात सात उपक्रमांद्वारे 2162.60 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या 1,30,703 शौचालयांच्या कामात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचे आढळून आल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘कॅग’च्या सर्वेक्षणात 2,326 शौचालयांपैकी (691) उपयोगात नाहीत. प्रामुख्याने वाहते पाणी नसणे, स्वच्छता व्यवस्थेचा अभाव, स्वच्छतागृहांचे नुकसान आणि इतर कारणांमुळे शौचालय लॉक केले होते. ऑडिटमध्ये कोल इंडिया लिमिटेडने केलेल्या 1,119 शौचालयांपैकी ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये 14 टक्के अर्धवट बांधलले आढळले, तर एनटीपीसीने बांधलेल्या 464 शौचालयांपैकी 17 टक्के शौचालये अर्धवट बांधलेली होती. एकंदर सर्वेक्षणात 72 टक्के शौचालयात पाणी नाही. 33 टक्के शौचालय उपयोगात नव्हते तर 55 टक्के ठिकाणी हात धुण्याची सुविधाच उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

सर्वेक्षणातून पुढे आलेले धक्कादायक वास्तव

 ‘स्वच्छ विद्यालय अभियान’ या अंतर्गत सात केंद्रीय सार्कजनिक क्षेत्र उपक्रमाद्वारे बांधलेल्या 2,612 शौचालयांचे सर्वेक्षण केले असता 200 शौचालये बांधलेली आढळली नाहीत.

86 शौचालये अर्धवट बांधली असल्याचे आढळून आले. कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या एकूण शौचालयांपैकी 11 टक्के शौचालयं अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले.

1967 सहकारी शाळांपैकी 99 शाळांमध्ये स्वच्छतागृहे सुरू नव्हती. तर 436 मध्ये केवळ एकच शौचालय वापरात होते. या 535 शाळांत मुले व मुलींसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.

Friday, September 25, 2020

वृत्तपत्रांनी पारंपरिक आर्थिक धोरण बदलून आत्मनिर्भर व्हावे-वसंत मुंडे


* संपादकांच्या गोलमेज परिषदेत अंकाची विक्री किंमत वाढविण्यावर एकमत.

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वर्तमानपत्रांचे अर्थकारण कोरोना महामारीने डबघाईला आले. आता वृत्तपत्रांना आपले पारंपरिक आर्थिक धोरण बदलून आत्मनिर्भर व्हावे लागेल. त्यासाठी वृत्तपत्राच्या अंकाची किंमत वाढवून दर्जा सुधारावा लागेल. तरच वृत्तपत्रांना आर्थिक स्थैर्य मिळेल असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले. राज्यातील पहिल्या गोलमेज परिषदेत संपादकांनी अंकाची किंमत वाढीच्या भूमिकेचे स्वागत करुन पाठींबा दिला.
औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या विभागीय कार्यालयाच्या वतीने राज्यातील पहिली वृत्तपत्र संपादकांची गोलमेज परिषद पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी दैनिक पुढारीचे संपादक धनंजय लांबे, सकाळचे कार्यकारी संपादक दयानंद माने, पुढारीचे युनिट हेड कल्याण पांडे, लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकीक, परिषदेचे निमंत्रक आणि पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रभू गोरे, ज्येष्ठ संपादक संतोष मानूरकर, संघाचे विभागीय संघटक वैभव स्वामी, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांच्यासह औरंगाबाद, जालना, अहमदनगर जिल्ह्यातील चाळीस वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते.  वर्तमानपत्रांचे पुजन करुन परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलतांना वसंत मुंडे म्हणाले, वृत्तपत्र कमी किंमतीत देण्याचे धोरण स्वीकारले गेले. अलीकडच्या काळात वृत्तपत्रांची संख्या वाढली आणि खप वाढवून जाहिरात मिळवण्यासाठी कमीत कमी किंमतीत वृत्तपत्रे घरपोहच देण्याची प्रथा सुरू झाली. जाहिरातीचे उत्पन्न कमी झाल्याने आता वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या वाईट दिवस आले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पारंपारीक आर्थिक धोरणाची मानसिकता बदलून अंकाची किंमत वाढवणे आणि दर्जेदार वर्तमानपत्र वाचकांच्या हाती देणे ही जबाबदारी संपादक व पत्रकारांना घ्यावी लागेल. तरच वृत्तपत्र आर्थिक पातळीवर सक्षम होतील. पारंपारीक पध्दतीने वृत्तपत्र चालवले तर फार काळ तोट्यात चालवणे शक्य होणार नाही परिणामी विभाग आणि जिल्हास्तरावरची वृत्तपत्रे बंद झाली तर स्थानिक राज्य व्यवस्था निरंकुश होतील व सर्वसामान्य माणसाचा आवाजच बंद होईल. याची जाणीव आता वाचकांना करुन देण्याची वेळ आली आहे. अलीकडच्या काळात वृत्तपत्रांचा कागद, शाई व छपाई खर्च दुपटीने वाढला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र मात्र 2 ते 5 रुपयात विकले जाते. प्रचंड तोटा सहन करुन हा व्यवसाय करावा लागतो. मधल्या काळात अनेक राजकारणी व्यक्ती, उद्योजक व भांडवलदारांनी आपल्या वेगवेगळ्या फायद्यासाठी वर्तमानपत्र काढले. मात्र या क्षेत्राला स्थेर्य मिळवून देण्याची भूमिका कुणीही घेतली नाही. ती भूमिका आता आपल्या सर्वांना घ्यावी लागेल असेही मुंडे यांनी सांगितले. 
संपादक धनंजय लांबे म्हणाले, आर्थिक गणित बिघडले की त्याचा दैनिक मराठवाडा होता. त्यामुळे वृत्तपत्रांच्या आर्थिक धोरणात बदल करण्यासाठी आता वृत्तपत्र मालकांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे लागेल. आपले मूल्य आपल्यालाच वाढवावे लागेल आणि प्रत्येकाने दर्जेदार पध्दतीने काम करून आपली क्षमता सिद्ध करावी लागेल, त्यासाठी निराशेची मरगळ झटकून नव्या जोमाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तर संपादक दयानंद माने यांनी वृत्तवाहिन्या आणि  समाज माध्यमांच्या भूमिकेने वृत्तपत्रांच्या खपावर दुरगामी परिणाम झाला आहे. डिजिटल माध्यमांकडे डोळसपणे पाहुन बदलत्या परिस्थितीत वृत्तपत्र  टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने आणि नवीन धोरणाने काम करावे लागणार आहे. तर कल्याण पांडे यांनी वृत्तपत्रांचे आर्थिक गणित  अत्यंत सोप्या पध्दतीत मांडले. कोरोनानंतर मोठी साखळी वृत्तपत्र आणि विभागीय व जिल्हा दैनिकांच्या अडचणी सारख्याच झाल्या आहेत. कोणताही फरक राहिला नाही. जाहिराती मिळवण्यासाठी खप वाढवला की तोटा वाढतो. त्यामुळे किंमती वाढवणे याचा विचार आता सर्वांनाच करावा लागेल. त्यासाठी एकत्र येऊन सामुहिक निर्णय घेतला तर या क्षेत्राला पुन्हा आर्थिक स्थैर्य मिळू शकते असा विश्‍वास व्यक्त केला. संपादक रविंद्र तहकीक यांनी माध्यम क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी एका पत्रकाराला विधान परिषदेवर नियुक्त करावे. त्याचबरोबर वृत्तपत्रांनी किंमत वाढवून समाजामध्ये आपली पत निर्माण करावी असे आवाहन केले. 
यावेळी निमंत्रक प्रा.डॉ.प्रभू गोरे यांनी परिषदेची भूमिका मांडताना आतापर्यंत वृत्तपत्रांनी समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. मात्र आता वृत्तपत्रच अडचणीत आल्याने सर्वांनी एकत्र येऊन या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल. आता आपल्यासाठी एकत्र येण्यासाठी ही परिषद असल्याचे सांगितले. तर पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष अनिल सावंत यांनी वृत्तपत्रांसाठी कठीण काळात किंमत वाढवणे हा पर्याय योग्य असल्याचे सांगुन एकत्रितपणे निर्णय घेण्याचे आवाहन केले.
परिषदेत वृत्तपत्रांनी अंकाची किंमत वाढवून, दर्जा सुधारुन स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. शासनाने वृत्तपत्रांना कागद व शाई सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावीत. वस्तु आणि सेवा करातुन सुट द्यावी. कोरोना संकटात कर्मचारी व पगार कपातीबाबत वृत्तपत्रांच्या मालकांना परावृत्त करावे. वृत्तपत्र क्षेत्राला लघू उद्योगाचा दर्जा द्यावा. शासनाच्या जास्तीत जास्त जाहिराती विभागीय व जिल्हा दैनिकांना देण्याचे एबीसीला बंधनकारक करावे. कोरोना काळात शहीद झालेल्या पत्रकारांना घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत मदत करावी. घरकुल व आरोग्य विमा योजनेची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करुन पत्रकारांना आधार द्यावा आदि मागण्यांचे ठराव गोलमेज परिषदेत संमत करण्यात आले. 
परिषदेला मेट्रो न्यूज चे संपादक मकरंद घोडके, अहमदनगर घडामोडीचे संपादक मनोज मोतीयानी, नगर स्वतंत्र चे संपादक सुभाष चिंध्ये व कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, लाभवार्ता चे संपादक मनोज पाटणी, दै. बदलता महाराष्ट्र चे संपादक विष्णू कदम, दै. राज्यवार्ता चे संपादक भरत मानकर, लाईव्ह महाराष्ट्रचे कृष्णा लोखंडे, वृत्त टाईम्सचे संपादक कल्याण अन्नपूर्णे, मनोज पाटणी, बहुजन हितायचे बबन सोनवणे, पब्लिक शासनचे प्रशांत पाटील, निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे, आकाश सपकाळ, जगन्नाथ सुपेकर, दै. सत्यनितीचे संपादक देविदास कोळेकर, पोलिस न्यूजचे संपादक कृष्णा कोल्हे, अशोक वानखेडे, रमाकांत कुलकर्णी, अभिजित हिरप, पुण्यनगरीचे डॉ. शेषराव पठाडे, दै. महानगरीचे अशोक देढे, लातूर पॅटर्नचे गोविंद काळे आदी उपस्थित होते. 
परिषदेच्या यशस्वीतेसाठी सचिव दिपक मस्के, संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख जॉन भालेराव, सरचिटणीस शिवाजी गायकवाड, महानगर उपाध्यक्ष हनुमंत कोल्हे,  बी.आर.इव्हेंट्स चे ऋषिकेश राऊत, अभिषेक राऊत आदींनी परिश्रम घेतले.
प्रारंभी कोरोना काळात शाहिद झालेले पत्रकार व वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परिषदेचे निमंत्रक प्रा. डॉ. प्रभू गोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी विविध ठरावांचे वाचन केले. प्रसिद्ध प्रमूख सचिन अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

ग्रामीण विकास लोकसंस्थेच्या वतिने एकल पालकांच्या मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप.

अहमदपूर ( प्रतिनिधी ) येथील नांदेड रोडवरील ग्रामीण विकास लोक संस्थेच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमात ,तालुक्यातील अर्थीक दुर्बल घटकातील एकल पालकांच्या मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 
यावेळी संस्थाध्यक्ष मच्छिंद्र गोजमे,सुनील खंडाळीकर,गंगथडे सर, पोद्दार मामा, प्रा.भगवान आमलापुरे यांची उपस्थिती होती.
 यावेळी संस्थाध्यक्ष मच्छिंद्र गोजमे यांनी या शैक्षणिक साहित्याचा खर्च जमा करण्यासाठी मी कुणाकुणाशी कसाकसा संवाद साधला हे सांगितले. जर १०० जणांशी संवाद साधला तर त्यातील ०४-०५ जण हो भरतात. तर त्यातील ०१- ०२ एक - दोघच प्रत्यक्षात मदत करतात.त्यामुळे,या शैक्षणिक साहित्याचा सदुपयोग व्हावा. वहीतील एकही पान वाया घालवू नका. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनील खंडाळीकर, प्रा.भगवान आमलापुरे यांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले. एस.ए.खंदारे,प्रा.गणेश मदने आणि जेष्ठ साहित्यीक एन.डी.राठोड यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

केंद्रात सत्ता असताना आणि भाजपा चे खासदार असतांनाही बीडचे आयकर कार्यालय जातेच कसे-बजरंग सोनवणे यांचा सवाल.


बीड (प्रतिनीधी ) :- केंद्रात भाजपचे सरकार बीड जिल्ह्यात भाजपचे खासदार असताना बीडचे आयकर कार्यालय औरंगाबाद आणि जालन्याला जातेच कसे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने आयकर विभागात काही फेरबदल करताना गेली अनेक वर्षे करदाते नागरिक, चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार यांना सेवा देणारे आयकर कार्यालय बीड येथून औरंगाबाद आणि जालन्याला हलवले आहे. सप्टेंबर पासून बीडचे कार्यालय जवळपास बंदच आहे. थोडक्यात काय तर आता करदात्या नागरिकांना जालना आणि औरंगाबादला हेलपाटे मारावे लागणार आहेत. १९७१ साली तत्कालीन खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीडचे आयकर कार्यालय सुरू करण्यात आले होते. ते कार्यालय आता २०२० साली सध्याच्या खासदारांच्या निष्क्रियतेमुळे बीड जिल्ह्या बाहेर जाणे ही दुर्दैवी बाब असल्याचेही बजरंग सोनवणे म्हणाले. खासदार ताईंनी वेळीच जागृत राहून आयकर कार्यालय बाहेर जाऊ दिले नसते तर आता निवेदने देण्याची नौटंकी करण्याची वेळच आली नसती. जिल्ह्यात ८० हजारहुन अधिक नोंदणीकृत आयकर प्रपत्र आहेत. तर १२ लाखांपेक्षा जास्त पॅन रजिस्टर आहेत. जिल्ह्यातील करदाते नागरिक, कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट या सर्वांनाच आता औरंगाबाद आणि जालना येथे हेलपाटे मारावे लागतील, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, याला जिल्ह्याच्या खासदारांचा निष्क्रियपणा जबाबदार नाही का? असा संतप्त सवाल श्री. सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. आहेत ती कार्यालये तरी सांभाळा! केंद्रात सहा वर्षे भाजपचे सरकार आहे, खासदार ताई देखील दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यातून खासदार म्हणून निर्वाचित आहेत, असे असताना नवीन कोणती कार्यालये जिल्ह्यात आणता येत नाहीत हे तर आता सिद्ध झाले आहेत; पण जिल्ह्यात जी कार्यालये आहेत ते तरी लक्ष देऊन सांभाळा असा टोलाही श्री. सोनवणे यांनी लगावला आहे. आयकर विभागाने बीडचे कार्यालय बाहेर पळवल्या नंतर ताईंना जाग आली, ही जाग आधी का आली नसावी असा सवाल यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला आहे

आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी आपले प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करावे.मुख्यमंत्र्यांचे आवाहन.




मुंबई -: राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.

*शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार*
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आशा स्वंयसेविकांना आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातील मंजूरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आशा स्वंयसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वंयसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार  राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. या शासननिर्णयानुसार लवकरच त्यांना सर्व  मोबदला मिळणार आहे.
*केंद्र शासनाकडे मागणी*
याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात  गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी  नव्याने केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.

*माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानात काम करतांना*
जोपर्यंत कोविड झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होत नाही तो पर्यंत कोविड विरोधातील लढाई आपण पुर्णपणे जिंकणार नाही. आपल्या मदतीनेच राज्यात “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” हे अभियान  राबविण्यास सुरुवात झाली आहे.  याकरिता आपणास केंद्र शासनाने दरमहा मंजूर केलेल्या  १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार आहे.  तसेच याकामी सोबतीला मदतीसाठी एक स्वंयसेवक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेतांना आपणास सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, सारखे संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मोहिमेतील माहिती संकलित करण्यासाठी व ती भरणे सोयीचे व्हावे यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपमध्ये माहिती भरतांना काही अडचणी आल्यास उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रपत्रात लेखी स्वरूपात माहिती भरण्याची मुभा देखील आपणास दिली आहे असे ही मुख्यमंत्र्यांनी आशा स्वंयसेविका आणि गट प्रवर्तकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

*कोरोना नियंत्रणात आशा स्वंयसेविकांचा अमुल्य वाटा*
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वंयसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून ६६ हजारांहून अधिक आशा स्वंयसेविका तर ४ हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वंयसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे. कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवतांना देखील त्यांची खुप मदत होत आहे. आशा स्वंयसेविकांनी कोविड प्रादुर्भावाच्या काळात प्रत्येक घराला भेट देऊन,कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून नियंत्रण मिळवण्यात अमुल्य वाटा उचलला आहे असेही मुख्यमंत्री या पत्रात आवर्जुन म्हणतात.
...

बीड जिल्हाचे नवे पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यांची परळीला भेट.



* संभाजीनगर, शहर व ग्रामिण पोलिसांना केल्या बैठकीतून सूचना.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्याचे नवे पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी परळी शहर, संभाजी नगर व ग्रामिण पोलिस स्टेशनला शुक्रवारी भेट दिली. शहर व तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा व पोलिस खात्याचा आढावा त्यांनी या भेटीत घेतला व अनेक प्रकारच्या सुचना त्यांनी पोलिसांना केल्या. कोरोनाच्या संकटात माणूसकीने आणि सतर्कतेने काम करण्याबरोबरच अनेक प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी अलर्ट राहण्याच्या सुचनाही त्यांनी भेटीदरम्यान दिलेल्या बैठकीत केल्या. चांगल्या कामासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून एकमेकांचे मनोबल वाढवा असेही त्यांनी सांगितले. परळीच्या भेटीबद्दल तीन्हीही पोलिस ठाण्याचे वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी शुक्रवारी जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांना भेटी देवून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. परळीतील संभाजीनगर, परळी शहर व ग्रामिण पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांचीही त्यांनी बैठक घेतली. पोलिस कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर आपण भर देणार असून, कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात असेही सांगितले. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील गुन्हे कमी करून घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला जास्तीत जास्त गती देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन केले. बैठकीत सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, हजर होते. संभाजीनगरचे पो.नि.बाळासाहेब पवार, स.पो.नि.नारायण गिते, पो.उप.नि.संतोष मरळ, चाँद मेंडके, कोरडे, परळी ग्रामीणचे पो.नि.शिवलाल पुर्भे, परळी शहरचे सपोनि एकसिंगे, खरात, आरती जाधव यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महेश बॕंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सोनार यांची आत्महत्या.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बँकेच्या एका अधिकार्याने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  महेश अर्बन को आॅप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र अरुण सोनार वय ५२ वर्षे या.विद्यानगर परळी यांनी अंबाजोगाई रस्त्यावरील घाटालगत एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. देवेंद्र सोनार हे दि.२३ रोजी  नेहमीप्रमाणे बँकेत जातो म्हणून घरातून गेले ते परत आलेच नाही.म्हणून त्यांच्या पत्नीने दि.२४ रोजी पोलीसात आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज सकाळी पोलीसांना त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भाजपच्या दावणीला बांधून मी समाजाशी बेईमानी करणार नाही.अविनाश खापे यांची आ.विनायक मेटेंवर टिका.



बीड (प्रतिनीधी ): मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. यात राजकारण नको होते. परंतू स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेकांचे राजकारण सुरुच आहे. भाजपच्या दावणीला बांधून मी समाजाशी बेईमानी करणार नाही, अशा शब्दात शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांच्यावर टिका केली. बीड येथील आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि.२५) ते बोलत होते.
  पुढे बोलताना अविनाश खापे म्हणाले, मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाला याला राज्य सरकार जबाबदार आहे, हे अर्धसत्य आहे. याला भाजप व आरएसएस तितकेच जबाबदार आहे. अंतर्गत खेळ्या करून जाणीवपूर्वक आरक्षण मिळू दिले नाही. गत पाच वर्षात राज्यात आणि केेंद्रात एकहाती सत्ता होती. त्यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या मराठा समाजातील कुटुंबियांना १० लाख आर्थिक मदत आणि एका वारसाला शासकीय नोकरी हे दिलेले आश्वासन का पाळले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, अनेक बाबी ह्या बोलण्यासारख्या आहेत. त्या मी समाजमाध्यमांवर जाहीर देखील केल्या आहेत. शिवसंग्रामध्ये काय चालते? हे सगळ ठाऊक झालं आहे. आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात बोललो की आमदार विनायक मेटेंना मिरच्या झोंबतात. आमच्यासाठी समाज महत्वाचा आहे. आम्ही बोललो की तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. आपण गेल्या पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय केलं? असा प्रश्न देखील खापे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आमदार विनायक मेटे यांनी समाजाला अंधारात ठेऊन हुजरेगिरी केली आहे. या बाबी खटकतात म्हणून मी त्या मांडल्या होत्या. त्यामुळे मुजोरी करत आमदार विनायक मेटे यांनी मला विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले. त्यामुळे आज मी जाहीरपणे शिवसंग्रामच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. तसेच, शिवसंग्रामच्या भाजपमध्ये विलगीकरणास खूप सार्‍या शुभेच्छा असा टोला देखील शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी लगावला आहे

लोखंडी सावरगाव रुग्णालयात उपलब्ध बेड बाबत नमिता मुंदडा खोटे आकडे का पसरवत आहेत. नागरीकांना मध्ये तरी संभ्रम पसरू नका.- पृथ्वीराज साठें



अंबाजोगाई (प्रतिनीधी )- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य विभागाने अत्यंत कमी वेळेत लोखंडी सावरगाव येथे उभ्या केलेल्या १००० बेडच्या जम्बो कोविड रुग्णालयाबाबत आ. नमिता मुंदडा यांनी संभ्रम पसरवणे थांबवावे, येथे खरोखरच किती बेड शिल्लक आहेत हे स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहावे आणि मगच बोलावे. प्रशासनाला मदत करता येत नसेल तरी हरकत नाही किमान नागरिकांमध्ये संभ्रम पसरवू नये अशी कानउघडणी माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी केली आहे.

 आ. नमिता मुंदडा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे लोखंडी येथील कोविड रुग्णालयात केवळ ३२५ बेड असल्याचा पोकळ दावा करत तेथे योग्य उपचारासाठी डॉक्टर्स व अन्य स्टाफ अपुरा असल्याचे म्हटले होते. हे आरोप खोटारडे असून घरबसल्या केलेल्या उचापती असल्याचे पृथ्वीराज साठे यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली असून लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात ६०० ऑक्सिजन बेड, ७५ व्हेंटिलेटर बेड, ५ हाय फ्लो नजल ऑक्सिजन कॅन्यूला उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त एक्स रे, सर्व प्रकारच्या रक्त व अन्य तपासण्या यासाठीची मशिनरी उपलब्ध आहे, तसेच सिटी स्कॅन मशीनची मागणी केलेली असून ती मशीनही येत्या काही दिवसातच बसवण्यात येईल. या रुग्णालयात सध्या (दि.२४ सायंकाळी पर्यंत) २४४ रुग्ण उपचार घेत असून त्यांवर उपचार करण्यासाठी १२ पूर्णवेळ डॉक्टर काम करत आहेत, तसेच केज, अंबाजोगाई, परळी, धारूर आणि वडवणी या पाच तालुक्यातील खाजगी व सरकारी डॉक्टर्सना येथे सेवा देण्यासाठी त्यांच्या ड्युटी लावलेल्या आहेत. रुग्णालयात वॉर्ड बॉय आणि नर्सेस ची संख्या १५० हुन अधिक असून आणखी नियुक्ती करणेही सुरू आहे. अशी अधिकृत माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना ९००० रुग्ण संख्या पार करत आहे, अशावेळी त्याचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या पाठी उभे राहून मदत करणे अपेक्षित असताना आमच्या आमदार ताई घरबसल्या नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती का पसरवत आहेत हे न उमगणारे आहे. त्यांचे पती जाऊन कोविड रुग्णालयातल्या भाताला नावे ठेवतात इथपर्यंत ठीक होते, पण आता उपलब्ध सुविधा आणि बेड ची संख्या याबाबत संभ्रम निर्माण करणे हे चुकीचे असल्याचेही पृथ्वीराज साठे यांनी म्हटले आहे.

मी शासकीय रुग्णालयात उपचार 
घेऊनच ठणठणीत झालो
दरम्यान मी लोकांमध्ये राहून कामे करण्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयातच उपचार घेऊन ठणठणीत बरा झालो. त्यामुळे आरोग्य विभागाने केलेल्या सोयी सुविधांवर माझा पूर्ण दृढ विश्वास आहे. त्याप्रमाणे अन्य लोकप्रतिनिधींनी शासकीय यंत्रणांवर विश्वास ठेवायला हवा असेही साठे म्हणाले. 

उदघाटनाला आला असतात 
तर बेड मोजून दाखवले असते!
दरम्यान लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयाच्या शासकीय उदघाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदारांना निमंत्रित केले होते, परंतु त्या आल्या नाहीत. आल्या असत्या तर प्रशासकीय व्यक्तिमार्फत त्यांना तेथील बेड मोजून दाखवले असते, असा टोलाही पृथ्वीराज साठे यांनी लगावला आहे.

नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्मारकाची वाईट अवस्था.शहर झाले घाणीचे माहेरघर.


किल्ले धारूर (प्रतिनिधी) -         किल्ले धारूर शहरातील हुतात्मा स्मारक हे एक शहराच्या वैभवाचे ठिकाण आहे व त्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे हुतात्म्यांच्या स्मरणात बांधलेते स्मारकाकडे नगरपालिकेची दुर्लक्ष होत असल्याकारणाने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे गाजर गवताने हुतात्मा स्मारकाची झाली वाईट दशा.  शहरांमध्येही ठीक ठिकाणी पाणी साचून घाणीचे प्रमाण वाढले आहे  त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो
  शहरांमध्ये ऐतिहासिक वैभव मोठ्या प्रमाणात आहे पण त्या वैभवाकडे  नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे शहरांमध्ये  हुतात्मा स्मारक हे प्रेरणादायी स्मारक म्हणून ओळखले जाते पण या स्मारकाकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे त्यामुळे तेथे  गाजर गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले असून तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता  झाली आहे त्यामुळे नागरिकांना तेथे  वावर करता येत नाही तसेच अस्वच्छता  मोठ्या प्रमाणात वाढली आहे एकेकाळी त्याठिकाणी शहरातील लहान -मोठ्या नागरिकांची  मोठ्या प्रमाणात चहल -पहल दिसत लहान मुला-मुलीसाठी  फिरण्याचे ठिकाण होते पण या अस्वच्छतेमुळे तिकडे नागरिक फिरकत नाहीत मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची पण आता ते पाहावयास मिळत नाही कारण तेथे एवढे गाजर गवत  झाले आहे की तेथे  सापची ही भीती होऊ शकते व एवढ्या गाजर गवतामुळे कुणाला तिथे जाता पण येत नाही व नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन हुतात्मा स्मारक स्वच्छ करून नागरिकांना ,लहान  मुलांचा वावर वाढण्यासाठी लवकरात लवकर साफसफाई करून घ्यावी तसेच शहरामध्ये सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात  घाणीचे साम्राज्य वाढले आहे यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर हुतात्मा स्मारक चा परिसर व शहरातील साफसफाईचे काम लवकरात लवकर हाती घेऊन करावे नागरिकातून अशी मागणी होत आहे

बीड जिल्ह्यातील बँकाच्या अडमुठ्ठे धोरणावर प्रशासनाचे व सरकारचे दुर्लक्ष- सुनील ठोसर पाटील.


बीड (प्रतिनिधी) - बीड जिल्डह्यातील शेतकऱ्याने खरीपाच्या पिकासाठी जिल्ह्यातील अनेक बँकेच्या  शाखेमध्ये पीक कर्जासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु विविध कारणाने "सिबिल" खराब असल्याच्या कारण देत हजारो शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज बँकांनी स्थगित ठेवलेले आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी बेबाकी प्रमाणपत्र देऊन देखील केवळ ऑनलाईन ला अपडेट नसल्यामुळे या कारणामुळे सदरील शेतकऱ्यांना पिक कर्ज बँकांनी दिलेले नाही. शासनाने फेरफार न घेता पीककर्ज वाटप करणे आदेश दिले असताना अनेक बॅंकांनी फेरफर च्या नावाखाली शेतकरी बांधवांना अडवणूक केली असून यात शेतकरी बांधवांना अनेक खेटे घालावे लागले आहेत अनेक तहसील व तलाठी यांचेकडे फेरफार अद्यापही भेटलेले नाही अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांना अर्ज केला तेही विविध कार्यालयात धूळ खात पडून आहे याकडे जिल्हाधिकारी साहेबांनी वेळीच लक्ष घालावे अशी मागणी अनेक शेतकरी बंधूंनी रयत शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकारी यांचेकडे केली आहे 

 महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात नसलेला हा न्याय बीड जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना लावलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्या अन्याय झालेला आहे व त्यांना पिक कर्ज मिळाले नाही. यामुळे असंख्य शेतकर्‍यांना खाजगी सावकाराच्या दावणीला बांधण्याचे महापाप जिल्ह्यातील बँका करत आहेत. यास्तव शिबिल च्या कारणामुळे स्थगित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना शेवटपर्यंत एकही सातबारा पीक कर्जाची वाटप करण्यात यावे या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात येत आहे. 

शिवाय पिक कर्ज वाटपाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा शक्यता कमी होत आहेत यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक साहेबांनी सदरील पिक कर्ज वाटपाची तारीख न ठरवता सर्व शेतकरी बांधवांना पीककर्जवाटप करणे बंधनकारक करण्यात यावे शासनाने तीनवेळा कर्ज माफी केली बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी एकदाही कर्ज माफी यादीत आलेले नाही अश्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताची कर्ज माफित समाविष्ट करण्यात यावे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी घेतलेले पीककर्ज अजूनही माफ झालेले नाही अश्या सर्व थकीत पीककर्ज व सातबारा कोरा करण्यात यावा बड्या अनेक कंपन्या व उद्योग यांचे हजारों कोटींचे कर्ज माफ केले?  कांदा बंदी निर्यात बंदी ? हजारो कोटी माफ करताना तेवढा वेळ लागला नाही आमच्या कर्ज माफीचा डांगोरा न करता मायबाप सरकार एवढं वेळ का? असे अनेक प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत. अनेक बँकेत कागदपत्रे जमा करून सुद्धा अनेक शाखेतील शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी प्रतीक्षा संपलेली नाही शासनाच्या आजपर्यंत परिपत्रक नुसार बीड जिल्ह्यातील अनेक बॅंकांनी पिक विमा रक्कम खाते ब्लॉक केले व अनेक शेतकरी बांधवांचे सर्व पीकविमा रक्कम तत्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात यावे बीड जिल्ह्यातील अनेक बॅंकांनी शेतकरी बांधवांना कोरोना काळात वेठीस धरून एजंट मार्फत लुटण्याचा गोरज धंदा सुरू आहे बीड जिल्ह्यातील सर्व बँकांना बँकेची नियमावली सर्व रक्कम आकडा व वाटप उदिष्ट फलक लावणे बंधकारक कराव बीड जिल्ह्यातील एकही बँकेवर दोषी शाखा व्यवस्थापक यांचेवर कार्यवाही केली नाही याकडे शासन व प्रशासन विभागाने लक्ष वेळीच दिले नाही तर अड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच रयत शेतकरी संघटना बीड जिल्हा वतीने सर्व शाखेवर बैलगाडी मोर्चा, आसूड मोर्चा सर्व शेतकरी बांधवांना पीककर्ज मिळेपर्यंत चालू राहील अशी मागणी बीड जिल्हा प्रमुख रयत शेतकरी संघटना सुनील नानासाहेब ठोसर पाटील, प्रमोद डोंगरे, नवनाथ आडे, अनिल काकडे, आदित्य ठोसर, दत्ता वाळेकर, संकेत वरांगे, प्रल्हाद जाधव, विष्णु काकडे, बेळेश्र्वर सूर्वसे, भगवानराव कदम, शिवदास सोळुंके, नईम अत्तर, अमोल भोकरे, अक्षय माने, भागवत वैद्य, शाहीन पठाण, मंगल आगलावे, माऊली नवले, बाबुराव भोईटे, राम नवले, राजे भाऊ मोरे, अर्जुन चाटे व सर्व रयत शेतकरी संघटनेचे शेकडो पदाधिकारी व बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले असून बॅंकांनी शेतकरी बांधवांना त्रास दिल्यास शेतकरी सोबत आसूड घेऊन बँकेत प्रवेश करतील यात शंका नाही असेही रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले आहे.

Thursday, September 24, 2020

पत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू करा.परळी पत्रकार संघाचे राज्य सरकारला निवेदन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ; कोरोनाच्या काळात जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्यातील पत्रकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता मात्र सुरक्षित नसल्याचे सध्या दिसते आहे. गेल्या पाच महिन्यांत कोरोनाने अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहेत. या बाबीची दाखल घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना राज्य सरकारने 50 लाखांचे विमा कवच लागू करावे अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली. याबाबतचे निवेदन बुधवारी तहसीलदार परळी यांना देण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील काळात अनेक पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे. पत्रकारिता हा व्यवसाय नसून तो पेशा आहे. समाजाच्या भल्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाची कुठलीही योजना अस्तित्वात नाही. जीव गमावल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट ओढवते. राज्यात कोरोनाने 50 पेक्षा जास्त पत्रकारांनी आपला जीव गमावला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांनाही विमा योजना लागू करू अशी घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली होती, मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शासनाने सदरील गोष्टीला गांभीर्याने घेऊन पत्रकारांना तात्काळ विमा कवच लागू करावे अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदन नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी स्वीकारले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धीरज जंगले, दत्तात्रय काळे, महादेव गित्ते आदी उपस्थित होते. या निवेदनावर परळीतील सर्व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.