Monday, August 3, 2020

गेवराई पोलीसांनी अवैध वाळुची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.



गेवराई (प्रतिनीधी ): गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरवर आज (दि. २ ऑगस्ट) रविवार रोजी दुपारी २ वा. स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय विजय गोसावी व त्यांच्या टिमने कारवाई केली. यावेळी १५५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गेवराई पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार तालुक्यातील उमापुर फाटा येथे एक ट्रॅकटर (क्र. एम. एच ३२ टी. ०१९५) हे वाळू घेवून जात होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय विजय गोसावी व त्यांची टिम इतर आरोपीच्या शोधात जात असतांना हे ट्रॅक्टर त्यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांनी ट्रक्टर चालक अभिषक गव्हाणे (रा. मादळमोही),  संजय रामदास पवार ट्रॅक्टर मालक (रा. सावरगाव, ता. गेवराई) यांच्याकडे कागदपत्रांची विचारपुस केली असता कुठलेही कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे सदसरचे ट्रॅक्टर गेवराई पोलिस ठाण्यात घेवून जात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सरदची कारवाई पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधिक्षक स्वप्निल राठोड, स्थानीक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत  यांच्या मागर्दर्शनाखाली एलसीबीचे एपीआय विजय गोसावी, जगतपा, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे यांच्यासह आदिंनी केली.

No comments:

Post a Comment