बीड (प्रतिनीधी )- शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पीएसआय तुपे यांच्याशी अरेरावी करणार्या पोलिस कर्मचार्या विरोधात गुन्हा दाखल झाल्या नंतर सदरील कर्मचार्यास पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या कर्मचार्याला कोठडी सुनावली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कर्मचार्यावर तडकाफडकी
निलंबनाची कारवाई केली. मिना तुपे ह्या जालना रोडवर पेट्रोलिंग करत असताना रिगल बिर्याणी हाऊस हे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हे बिर्याणी हाऊस बंद करण्यावरून पोलिस कर्मचारी संदीप गिराम याने शिवाजीनगर ठाण्याच्या पीएसआय मिना तुपे यांच्याशी वाद-विवाद केला. या प्रकरणी तुपे यांच्या फिर्यादीवरूनशिवाजीनगर पोलिस ठाण्यात गिराम याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्यास कोठडी सुनावली. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गिराम यास तात्काल
निलंबीत केले.
No comments:
Post a Comment