Monday, August 31, 2020
मंदिरं खुली होणार, आठ दिवसात नियमावली, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन' : प्रकाश आंबेडकर
लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयाचे लोकार्पण ना. राजेश टोपे यांच्या हस्ते व धनंजय मुंडेंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांकडून अथक प्रयत्न, देशभरातून प्रार्थना होत असूनही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे”.१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.
इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.
राष्ट्रवादी काॕग्रेस चे निष्ठावान अशोक डकांचा वनवास संपवला. मुंबई कृ.उ.बा.च्या सभापतीपदी बिनविरोध.

मुंबई (प्रतिनीधी ):- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपासभापती पदाच्या निवडणुकीत सभापती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजलगाव कृषी उत्पन्ना बाजार समितीचे सभापती अशोक डक तर उपसभापती म्हणून कॉंग्रेसचे धनंजय वारकर यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या पाच महिन्यापुर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली होती. लॉकडाऊनमुळे सभापती व उपसभापती पदाची निवडणुक लांबणीवर पडली होती. ती आज मुंबई येथील बाजार समितीमध्ये पार पडली. बीड जिल्ह्याला हे एक सर्वात मोठं पद मिळालं आहे.
मुंबई बाजार समितीची निवडणुक १९ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान होवून २ मार्च रोजी मतमोजणी झाली होती. त्यात महाविकास आघाडीचे सर्वचे सर्व संचालक निवडुण आले होते. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या पाच महिन्यापासून सभापती, उपसभापती पदाची निवड झाली नव्हती. अखेर आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ही निवडणुक पार पडली. सदरच्या बाजार समितीत १७ सदस्य असून राष्ट्रवादी कॉंग्रेस १०, कॉंग्रेस ४, शिवसेना १, शेकाप १, अपक्ष १ असे सदस्य निवडुण आलेले होते. आज सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी बीड जिल्हाध्यक्ष अशोक डक तर उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे धनंजय वारकर यांनी अर्ज दाखल केले. अन्य अर्ज आले नसल्याने सदरची निवडणुक ही बिनविरोध झाली असून सभापतीपदी अशोक डक तर उपसभापती धनंजय वारकर यांची निवड झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी हे मोठे पद अशोक डक यांच्या माध्यमातून मिळालं आहे. गेल्या चाळीस वर्षापासून डक कुटुंबिय राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले असून अशोक डक यांचे वडिल माजी आमदार गोविंदराव डक यांच्यापासून शरद पवारांचे विचार लोकांपर्यंत पोहचवित आले आहेत. गोविंदराव डक यांचे चिरंजीव व माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक हे औरंगाबाद महसूलमधुन निवडुण अले होते. अखेर एकनिष्ठतेला राष्ट्रवादीत न्याय मिळत असल्याचे पुन्हा एकदा डक यांच्यावर सभापती पदाची जबाबदारी टाकून पवार कुटुंबियांनी फळ मिळत असल्याचे दाखवून दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शरद पवारांचे विचार घराघरात पोहचविणारे अशोक डक मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष झाल्याने त्यांच्या समर्थकात जल्लोष साजरा केला जात आहे.
Saturday, August 29, 2020
अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात100 कोटी देणार - धनंजय मुंडे
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन.
राज्यातील शाळा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता.;- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
* मैत्रीच निखळ नात *
Friday, August 28, 2020
सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन- ना.धनंजय मुंडे
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकाच मंचावर टोलेबाजी.
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज एकाच मंचावर जोरदार टोलेबाजी पहायला मिळाली. हे दोन्ही नेते पुण्यातील बाणेर येथील कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनासाठी एकाच मंचावर आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज आवाज असं म्हटलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असं म्हणाले. हे ऐकूण बाजूला बसलेल्या अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.
या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनीही जोरदार टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही येणार आहेत असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजनयुक्त 200 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी राज्यात दररोज जवळपास 15 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. संसर्गाचा दर हा 15 टक्के आहे, हे चिंताजनक आहे. आजही आपला मृत्यूदर हा 3.2 टक्के आहे, जो देशापेक्षा जास्त आहे. टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात टेस्टिंग समाधानकारक असलं तरी मुंबईत टेस्टिंग खूप कमी असल्याचं म्हटलं आहे.
गेवराईत दुसर्या दिवशीही पोलीसांची वाळू माफीयांवर कारवाई.
*महसूल प्रशासन गप्प का?

गेवराई (प्रतिनीधी )ः-महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन गेवराईत वाळू माफीया वाळूचा सर्रासपणे उपसा करतात. मात्र यांचे याकडे दुर्लक्ष का होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून पोलीसच वाळू माफीयांवर कारवाया करत असून आज तिन ट्रॅक्टर वाळू उपसा करण्याची किनी व एक इंजन ताब्यात घेतले.
गेवराई तालुक्यातील आगरनांदूर परिसरातून वाळू माफीया वाळूचा उपसा करत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच आज सकाळी त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी तेथे वाळूने भरलेले तिन ट्रॅक्टर , वाळू उपसा करणारी किनी, व एक इंजिन आढळून आले. पोलीसांनी हे सर्व ताब्यात घेवून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी घेवून जात असतांना नांदूर फाटा येथे आल्यावर एका ट्रॅक्टर चालकांने गेवराईकडे ट्रॅक्टर घेण्याऐवजी ते औरंगाबादकडे घेवून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका पोलीस कर्मचार्यांने त्याला ट्रॅक्टर गेवराईकडे घेण्याचे सांगितल्याने ट्रॅक्टर नांदूर फाटा येथे पलटी झाले. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात वाळू माफीयांसह पकडलेले ट्रॅक्टर पळून नेणार्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. स्थानिक पोलीस व बीड येथून येऊन एसपीच्या पथकाच्या कारवाया सुरूच असून महसूल प्रशासन झोपेच सोंग घेत आहे. तर रात्रंदिवस सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत जिल्हाधिकारी यांना अनेक निवेदन व तक्रारी देऊनही स्थानिक अधिकार्यांवर त्यांचा कुठलाच वचक नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
धारूरचे तहसील कार्यालय बनले लिंगायत स्मशानभुमी.
* दुसर्यादिवशीही मृतदेह स्मशानाऐवजी तहसीलसमोर.
* लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटलाच नाही.
धारूर (प्रतिनीधी ): लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमन केल्यामुळे हे अतिक्रमन उठवण्याची मागणी केली जात असल्याने प्रशासनाकडून मात्र अद्यापही अतिक्रमन हटवण्यात आले नाही. काल एक अन्त्ययात्रा तहसील कार्यालयात आणण्यात आली होती, तोच पुन्हा आज एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने त्याचाही मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत याबाबत तोडगा निघालेला नव्हता.
धारूर येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विवादीत आहे. यावर तोडगा काढण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचे दिसून आलेले आहे. स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमन झाल्याने हे अतिक्रमन हटवले जात नसल्याने वाद उद्भवत आहेत. काल एकाचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. प्रशासकीय अधिकार्यांनी समजूत काढल्यानंतर सदरील मृतदेहावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी गंगाधर गुळवे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेेवला. रस्त्यावरचे अतिक्रमन हटवण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दुपारपर्यंत याबाबत चर्चा सुरू होती
मुलाने प्रेम विवाह केला, सासर्याकडून सुनेची हत्या .
* बायकोच्या पाठीतही वार, पट्टी वडगांव येथील धक्कादायक घटना.
अंबाजोगाई (प्रतिनीधी ):- प्रेम विवाह केलेल्या लेकावर नाराज असलेल्या पित्याने लेक आणि सून गावाकडे आल्यानंतर त्यांना घरात का घेतले म्हणून पत्नी सोबत वाद केला आणि तो रागाने घरातून बाहेर पडला. परंतू आपल्या सुने विरूद्धचा राग त्याच्या मनात घर करून होता. काल अखेर रागाच्याभरात सासर्याने सूनेच्या मानेवर कुर्हाडीने घाव केले. पत्नी आडवी आली असता तीही जखमी झाली. सासर्याच्या खूनी हल्ल्यात सून जागीच ठार झाली. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे रात्री घडली. या प्रकरणातील खूनी सासरा पोलीसांनी गजाआड केला आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत उच्च शिक्षण विभागाचे राज्यपालांपुढे सादरीकरण.
मुंबई, (प्रतिनीधी ) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींबाबत त्यांचेपुढे सादरीकरण केले.
राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षणे नोंदवीत उपयुक्त सूचना केल्या.
शिक्षणातील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, सन २०२५ पर्यंत उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण ५० टक्के इतके वाढविणे, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, मातृभाषेतून शिक्षणाला चालना देणे, डिजिटल ग्रंथालये, व्यवसायिक शिक्षणावर भर, या तसेच धोरणातील इतर तरतुदींसंदर्भात राज्यपालांना विस्तृत माहिती देण्यात आली.
तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे देखील यावेळी उपस्थित होते.
Thursday, August 27, 2020
गेवराई पोलीसांची वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई.
* सापळा रचत हिंगणगाव गोदापात्रात छापा . 7 लाख 40 हजाराचा ऐवज जप्त.

गेवराई ;-(प्रतिनीधी ) तालुक्यातील गोदापात्रातून वाळू माफियांकडून
रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याबाबत
गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने सापळा रचून तालुक्यातील हिंगणगाव
गोदापात्रात छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण 7 लाख 40 हजाराचा रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील गोदापात्रात सुरू असलेल्या वाळू उपशाबाबाबत महसूल
प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असताना पोलीस प्रशासनाकडे येत असलेल्या
तक्रारीची दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नीलकुमार राठोड यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या पथकाने सापळा
रचत दि.26 रोजी साध्या वेशात पिकअप मध्ये बसून जात तालुक्यातील
हिंगणगाव येथील गोदापात्रात छापा टाकला पोलिस येत असल्याचे दिसताच
याठिकाणांहून वाळू माफियांनी धूम ठोकली. दरम्यान याठिकाणी दोन ट्रॅक्टर व
चार केन्यासह असा एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला असून सदरील मुद्देमाल ट्रॅक्टरमध्ये घालून गेवराई पोलीस ठाण्यात आणून
पो.नाईक गणेश तळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात चोरी व गौणखनिज अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निलकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या पथकाचे सपोनि राजाराम तडवी,पो.ना.शरद
बहिरवाळ,परमेश्वर तागड,अंकुश वरपे,नारायण खटाने,प्रधान,अमोल खटाने यांनी केली. तर पोलीस प्रशासनाच्या या कारवाईने वाळू माफियांमध्ये दहशत
निर्माण झाल्याचे दिसत आहे.
स्वामी.रामानंद तीर्थ रूग्णालयाच्या हंगामी कर्मचार्याचा कोरोनाने मृत्यू.
लिंगायतसमाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही.धारूर तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवला.
अंबाजोगाई पोलिसांची कामगिरी लाखोंचा गुटखा पकडला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.
दिव्यांगांचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडवणार - धनंजय मुंडे.
*दर आठवड्याला बैठक घेऊन आढावा घेण्याच्या धनंजय मुंडे, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विभागाला सूचना.
मुंबई - : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे
धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वेबिनार बैठकीमध्ये याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव दिनेश डिंगळे, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी दत्ता बाळसराफ, दिव्यांग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर अन्य पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित व वेबिनार द्वारे सहभागी होते
मार्चपासून कोरोनामुळे मंदावलेल्या कामांना वेग देण्याबाबत सूचना ना. मुंडे यांनी संबंधितांना केल्या. तसेच खा. सुप्रियाताई सुळे यांनी सुचवल्याप्रमाणे त्याचा आढावा दर आठवड्याला सादर करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत
या बैठकीमध्ये नवीन शैक्षणिक धोरण व दिव्यांगांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम, महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग धोरण - २०१८ व कृती आराखडा, दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी व त्याचा विनियोग आदी विषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रांच्या बळकटीकरण करण्यासंदर्भात विभागाला निर्देश देण्यात आले आहेत
या बैठकीमध्ये दिव्यांगांसाठीच्या विशेष शाळांची नोंदणी सुलभ करणे तसेच विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे जसे की श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव आदी उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यासाठी विभाग निहाय वेबिनार आयोजित करून त्याचा आढावा विभागास सादर करण्याचे निर्देशही ना. मुंडेंनी यावेळी दिले
स्टार की फाउंडेशन अमेरिका व सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक श्रवणयंत्र, दिव्यांगांना कृत्रिम अवयव, ज्येष्ठ नागरिकांना विविध आवश्यक साहित्य आदी उपलब्ध करून देण्याचे निश्चित झालेले आहे. याअंतर्गत जालना व बीड या दोन जिल्ह्यात सर्वेक्षण करून आरोग्य शिबीर संपन्न झाले आहे. तर जालना जिल्ह्यात श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरीत जिल्ह्यातील या कामांना गती देण्याबाबतही निर्देश ना. मुंडे यांनी यावेळी दिले
दरम्यान दिव्यांग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर यांनी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ना धनंजय मुंडे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दिव्यांग बांधवांच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्याची आपली भूमिका असून, या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन घेऊन आपण स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. मुंडे यांनी या बैठकीत सांगितले.
Wednesday, August 26, 2020
एम.पी.डी.ए.कायद्या अंतर्गत आणखी एका गुंडाची हर्सुल कारागृहात रवानगी.
परळी येथील अरुण टाक अँड सन्सवर महिला चोरट्यांचा डल्ला.
* तोंडाला स्टोन बांधून दोन लाखांचे सोने केले लंपास. आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद.
परळी वैजनाथ परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील अरुण अँड सन्स ह्या सोने-चांदीच्या दुकानी तोंडाला स्टोन बांधून अज्ञात महिलांनी जवळपास दोन लाखांचे सोने लंपास केले. विशेष म्हणजे श्रीगणेश आणि महालक्ष्मीच्या पार्श्वभूमीवर सदर चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता. ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने सोने-चांदी व्यापार्यांत घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री गणेश स्थापना आणि महालक्ष्मी ह्या सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा गैरफायदा घेत सोने चांदीच्या दुकानी गेली आणि दिवसांपासून काही अज्ञात महिला डल्ला मारण्याचा इराद्याने बाजारात फिरत असल्याची बातमी शहरांमध्ये फिरत होती. मात्र फिरत असलेली बातमी आज सत्यत्तेच्या स्वरूपात समोर आली. परळी शहराची हार्ट ऑफ सिटी म्हणून नावलौकीक असलेले राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात अरुण टाक यांचे गेली अनेक वर्षांपासूनचे जुने अरुण टाक अँड सन्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. सदर दुकानी भरदिवसा म्हणजे अंदाजे बारा ते साडेबारा दरम्यान काही अज्ञात महिला तोंडास स्टोन बांधून ह्या दुकानी सोने खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील नौकरांना गंठण दाखवण्याची मागणी केली. बागडी केल्यानुसार नोकरांनी सोन्याचे विविध प्रकारचे गंठनही दाखवले. मात्र अरुण टाक यांचे नोकरवर्ग सदर महिलांना विविध प्रकारचे गंठण दाखविण्यात व्यस्त असतानाच त्याचा गैरफायदा घेत नोकरांच्या डोळ्यात धूळ फेकल्यागत तोंडावर स्टोन बांधलेल्या त्या महिलांनी एकूण चार तोळे वजन असलेले दोन गंठण ज्यांची अंदाजे किंमत दोन लाख रुपयाची आहे दिवसा ढवळ्या लांबवले. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात सोन्या-चांदीची अनेक दुकाने आहेत त्यामुळे ह्या भागास सोनार लाईन देखील म्हंटले जाते. क्षणात ही वार्ता सोन्या-चांदीच्या व्यापार्यांत पसरली आणि एकच खळबळ उडाली सध्या परिस्थितीत जो तो व्यापारी असुरक्षित समजत आहे. दरम्यान या घटनेबद्दल अरुण टाक अँड संन्सचे मालक अरूण टाक यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली. बातमी लिहीपर्यंत अद्याप शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच सणासुदीचे दिवस असल्याकारणाने सदर भागात आणि बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा आणि त्यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असावा जेणेकरून अशी घटना घडल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी संशयित महिलांची तपासणी करू शकतील अशी मागणी व्यापारी वर्गात होत आहे.
Tuesday, August 25, 2020
बीड मध्ये पावडर कोटिंगच्या दुकानात गॕस गळती होउन स्फोट एक ठार.तिघे जखमी.
बीड (प्रतिनिधी) पावडर कोटींगच्या गॅस गळती होवून स्फोट झाल्याने ३० वर्षीय तरूण गंभीररित्या जखमी होवून ठार झाल्याची घटना पांगरी रोडवरील करपरा नदीजवळ आज दुपारी घडली. यात अन्य तिघे जण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट झाल्यानंतर करपराचा परिसर हादरून गेला हेाता. संतोष गिराम (वय ३०, रा.गिरामनगर बीड) या तरूणाचे पांगरी रोडवरील करपरा नदीजवळ पावडर कोटींगचे दुकान आहे. दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान गॅस गळती होवून त्याचा स्फोट झाला. यात संतोष गिराम हा तरूण गंभीररित्या जखमी होवून ठार झाला. तर काम करणारे अन्य तिघेजण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर करपरानदीचा परिसर हादरला होता. स्फोट होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
बीड न.प.सफाई कमगारांचे थकीत वेतनासाठी उपोषण .

* मुख्याधिकार्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा बीड पोलिसात तक्रार .
बीड (प्रतिनीधी )- विधानसभा निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेने तब्बल दीडशे महिला कामगारांकडून शहरात स्वच्छता मोहीम राबविली. मात्र नंतर आस्थापनेवरील या सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करत काम केलेल्या कार्यकाळातील दोन महिन्यांचे वेतनही दिले नसल्याने संतापलेल्या या सफार्स कामगारांनी आज थेट बीड शहर पोलिस ठाण्यात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
बीड नगरपालिके मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार हे काम करतात. नगरपालिकेला जेव्हा गरज असते तेव्हा नगरपालिका या सफाई कामगारांकडून काम करून घेते आणि नंतर त्यांना बेकायदेशीररित्या काढून टाकते. विधानसभा निवडणुकीपुर्वी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी या कामगारांनी मोठे काम केले मात्र त्या दोन महिन्यांचे वेतन द्यायचे सोडून नगरपालिकेने कामगारांनाच सेवेतून बडतर्फ केले. सदरची बडतर्फी ही बेकायदेशीर आहे, याबाबत अनेक वेळा या कर्मचार्यांनी जिल्हाधिकार्यांसह शासन-प्रशासन व्यवस्थेकडे निवेदन देऊन दाद मागितली, अनेक वेळा आंदोलने केली मात्र याकडे बीड नगरपालिकेने सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे संतापलेल्या कर्मचार्यांनी आज बीड नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले मात्र या उपोषणाकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पाहून कर्मचार्यांनी थेट मुख्याधिकार्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, याबाबतची तक्रार बीड शहर पोलिसात केल्याने खळबळ उडाली आहे.
चिंचपुर रोडवरील महानुभाव पंताच्या आश्रमात चोरट्यांचा धुमाकुळ.

* आश्रमातील साधक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आश्रमाला होते कुलूप.
धारुर (प्रतिनीधी )- चिंचपुर रोडवर असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील बारा भक्तांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोवीड वार्डात दाखल करण्यात आले होते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने आश्रमाचे कुलूप तोडून आतमध्ये धुमाकुळ घालत आतील पेटी शेतामध्ये नेवून फोडली. आश्रमातील किती मुद्देमाल चोरीला गेला हे समोर आलेले नव्हते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी भेट देवून पाहणी केली.
चिंचपूर रोडवर महानुभाव पंथाचे कृष्ण मंदीर व गिता ज्ञान आश्रम आहे. या आश्रमात पाच पुरूष व आठ वयोवृध्द महिला साधक राहतात. काही दिवसापूर्वी या आश्रमातील तेरा पैकी बारा साधकांना कोरानाची लागण झाल्याने त्यांना कोवीड वार्डात दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून आश्रमाला कुलूप लावलेले होते. याच संधीचा फायदा चोरट्याने उचलला. आश्रमाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत आश्रमात धुमाकूळ घातला. आश्रमातील पेटी उचलून नेवून शेतामध्ये फोडली. आश्रमातील काय चोरीला गेले हे मात्र समोर आलेले नव्हते. घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे
पतीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच. पत्नीचा धक्क्याने मूत्यू.

धारूर (प्रतिनीधी ) पती कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने त्याला उपचारासाठी आरोग्य विभागाने नेले असता याचा धक्का घेत भितीपोटी सदरील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे समोर आली असून कोरोनाची भिती आणि दहशत आजही लोकांच्या मनात असल्याचे यावरून समोर येते.
धारूर तालुक्यातील गावंदरा येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट काल पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी सदरच्या व्यक्तीला कोवीड सेंटरमध्ये नेले. याचा धक्का पत्नीला बसला आणि तिचा रात्री मृत्यू झाला. गावंदरा येथील पाच व्यक्तीचे स्वॅब परवा कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी या ६० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता त्या चार व्यक्तींमध्ये सदरच्या व्यक्तीच्या पत्नीचाही स्वॅब घेण्यात आला होता मात्र ती नेगेटिव्ह आली होती. आपल्या पतीला कोरेाना झाला आहे या भितीने सदरील महिलेचा धक्का सहन न झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोनाबाबत अद्यापही सर्वसामान्य नागरीकात भिती असल्याचे या घटनेवरून पुढे येत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाबत जनजागरण आणि लोकांमधील कोरोनाची दहशत संपुष्टात यावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
राज्य सरकार मराठा आरक्षणसंदर्भात दाखवत असलेला हलगर्जीपणा चिंताजनक - आ.विनायक मेटे

नवी दिल्ली ; मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून कसलीही तयारी नाही, हे सरकार आरक्षणसंदर्भात गंभीर नसून निव्वळ हलगर्जीपणा दाखवत आहे. घटनापीठाकडे आरक्षण प्रकरण पाठवा असे राज्य सरकारला आम्ही म्हंटले होते मात्र सरकारने ते हि तिकडे पाठवले नाही, शेवटी २७ जुलैच्या दरम्यान आम्ही सगळ्यांनी मागणी लावून धरल्यानंतर राज्य सरकारने हि मागणी केली, सुरुवातीपासून सर्वोच्च न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी करण्यात येऊ नये मागणी केली होती मात्र राज्य सरकारने न्यायालयात अशी मागणी केलीच नाही, उलट आम्हाला कागदपत्रे व माणसे आणता आली नाही असे सांगितले. राज्य सरकार पाहिजे ते काम करत नाही मात्र नको ते आवर्जून करत असल्याने आरक्षणसंदर्भात राज्य सरकारचा कारभार हा चिंताजनक वाटत असल्याचा आरोप दिल्ली येथे आ विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
ज्या वरिष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात आरक्षणाची केस लढली आहे त्यांनाच सर्वोच्च न्यायालयात केस लढविण्यासाठी नेमणे आवश्यक होते मात्र राज्य सरकारने यातील काहीच लोकांना घेऊन बर्याच अनुभवी लोकांना वगळले आहे, म्हणून आमच्यासारख्या काही आरक्षण टिकवू इच्छिणार्या लोकांना अनुभवी व्यक्ती नेमावे लागत आहेत. उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आरक्षणासाठी काहीही करत नाहीत, देशातील मराठा समाज, अनेक लोकं, आम्ही जाणते राजे म्हणतो त्या शरद पवार साहेबांना आंम्ही मानतो, त्या पवार साहेबांनी आपल्या अनुभवाचा, अभ्यासाचा उपयोग मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी करणे गरजेचे होते मात्र माननीय पवार साहेबांनी याबाबत काहीही केल्याचे मला आतापर्यंत दिसले नसल्याचे आ विनायक मेटे यांनी म्हंटले असून पवार साहेबांनी याबाबत न बोलणे हे मराठा समाजाला कळनासे झाले असून आपण देशाचे, राज्याचे आन मराठा समाजाचे नेते असताना आपण समाजासाठी उपसमिती अध्यक्ष, मुख्यमंत्री यांना बोलावून घेऊन आरक्षण टिकवण्यासंदर्भात बैठक घ्यायला हवी. असे त्यांनी केले तर मराठा समाज पवार साहेबांना कधीही विसरणार नाही. उपसमिती अध्यक्ष अशोकराव चव्हाण फक्त बैठका घेऊन तयारी झाल्याचे सांगतात मात्र करत काहीच नाहीत, पवार साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्वांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवणार असल्याचा शब्द द्यावा अशी मागणी आ विनायक मेटे यांनी केली आहे.


