* जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर , दोषींवर कठोर कार्रवाईची मागणी.
बीड (प्रतिनिधी): सामाजिक कार्यकर्ता मोमीन बाबा खमरोद्दीन यांना निमोनिया झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. श्वासोश्वासाचा त्रास होत असल्याने वेंटीलेटर लावने आवश्यक होते. कांही सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांनी आयसीयू मध्ये ठेवण्याची विनंती केली मात्र जिल्हा शल्यचिकीत्सक सह सर्वांनी मागणी कडे दुर्लक्ष्य केले. तुमचा पेशंट घाबरलेला आहे ठीक होईल असे उत्तर मिळाले. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला.बाबा खमरोद्दीन यांच्या मृत्यूस संबंधित डॉक्टर व आरोग्य यंत्रणा जबाबदार असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सोमवारी अपर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
सोमवारी अपर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि, सामाजिक कार्यकर्ता मोमीन बाबा खमरोद्दीन यांना 14 जुलै रोजी रात्री निमोनियाचा त्रास होत असल्याने वार्ड क्रमांक 6 मध्ये भरती करण्यात आले होते. दरम्यान आरोग्य प्रशासनाने त्यांची कोविड-19 की तपासणी केली ती निगेटिव्ह आली. यानंतर ही त्यांना जिल्हा रूग्णालयातील कोविड वार्डात ठेवण्यात आले. वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार स्वत: नातेवाईकांनी केली होती. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे पेशंटला आयसीयूमध्ये ठेवण्याची विनंती केली. वार्ड क्रं. सहा मध्ये देखील आयसीयू ची सुविधा असल्याचे सांगण्यात आले. मात्र डॉ. चिंचोले व नर्स वगळता कोणीही पेशंटकडे ढुंकुन ही पाहिले नाही. वेळेवर आवश्यक ते उपचार न मिळाल्याने मोमीन बाबा खमरोद्दीन यांचा 17 जुलै रोजी मृत्यू झाला. असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. पुढे तक्रारित म्हटले आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमी वर करोडो रूपए खर्च करून कोविड वार्ड उभारण्यात आला मात्र या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. कोविड हॉस्पिटल मध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात की नाही याची तपासणी करण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे. डॉ. रेवलकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी. प्रशासनाने कोविड हॉस्पिटल मध्ये पीपीई कीट,व्हेंटीलेटर, आक्सिजन, औषधे व वाढीव स्टाफ, 24 तास फिजीशियन आदि उपलब्ध करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात नगर पालिकेचे गट नेता सामाजिक कार्यकर्ता फारूक पटेल, नगरसेवक शेख एकबाल, राकांपा अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष बरकत खान पठाण, हमीदखान, समीर तांबोळी, सय्यद मोहसीन, शेख बब्बु आदिंचा समावेश होता.
No comments:
Post a Comment