परळी वैजनाथ : श्रावणात पहिल्यांदाच परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बंद
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने देवाला देखील सोडलेलं नाही. परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिर श्रावणात पहिल्यांदाच भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वैद्यनाथ मंदिर बंद करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून आली. मध्यरात्री मुख्य पुजाऱ्याकडून वैद्यनाथाची पूजा करण्यात आली. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी व तिसऱ्या सोमवारी विशेष महत्त्व असते देशभरातून इथे भाविक येतात. मात्र कोरोना महामारीमुळे मंदिर बंद करण्यात आल्याने भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच पूजा करत दर्शन घेतले. एकंदरीत वर्षानुवर्षे गर्दीने फुलून निघणारे वैद्यनाथ मंदिर आज मात्र शांत व सुनेसुने दिसून आले.
No comments:
Post a Comment