Friday, July 17, 2020

पुढार्‍यांचा फक्त मतांवर डोळा विकासाकडे दुर्लक्ष.

* अव्वलपूरच्या खराब रस्त्यामुळे नागरिकांना त्रास.

बीड (प्रतिनीधी )- प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी नागरिकांना फक्त
आश्‍वासने देतात, विकास कामांकडे सातत्याने दुर्लक्ष करतात. अनेक गावांना
साधा खडीकरणाचा रस्ताही नाही. रस्त्या अभावी नागरिकांना पावसाळ्यात विविध
अडचणींना तोंड द्यावे लागते. अव्वलपूर येथे रस्ता नसल्याने चिखल तुडवत लोकांना प्रवास करावा लागतो. सदरील रस्ता दुरुस्तीबाबत अनेक वेळा तक्रारी निवेदने देऊनही कोणीच लक्ष देत नसल्याने गावकर्‍यात संताप
व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यातील अनेक गावांना स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही
व्यवस्थीत रस्ते नाहीत. रस्त्याअभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना
करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्याने पायी चालणे मुश्किल होते. निवडणुकीत
मात्र पुढारी नुसत्या आश्‍वासनाच्या खैराती वाटत असतात, निवडून आल्यानंतर
सामाजिक प्रश्‍न सोडवले जात नाहीत. बीड तालुक्यातील अव्वलपूर येथे रस्ता
नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या पावसाळ्यात रस्त्यावर गुडघ्या इतका चिखल झाला. नागरिकांना पायी चालता येत नाही, तिथं वाहने कशी घेऊन
जायची असा प्रश्‍न निर्माण होत आहे. सदरील रस्ता दुरुस्तीकडे सार्वजनिक
बांधकाम विभागाने तरी लक्ष द्यावे, अशी मागणी अव्वलपूर येथील नागरिकांनी
केली आहे.

No comments:

Post a Comment