Monday, July 20, 2020

राजगृहवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुरोगामी पञकार संघाकडून परळी तहसिलदार यांना निवेदन .


परळी वैजनाथ [ प्रतिनिधी ] भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानावर माथेफिरु एका युवकांनी दगड फेक करुन आजूबाजूच्या कुंड्यांची तोड-फोड करुन खिडक्यावर दगडाने फोडल्यामुळे हि वास्तू समाजासाठी दैवत आणि आस्मिता आहे. त्यामुळे या युवकाला तत्काळ अटक करण्यासाठी आज पुरोगामी पञकार संघाकडून महाराष्ट्रातून प्रत्येक संघाच्या सदस्यांकडून जिल्हा जिल्हाधिकारी, उप-जिल्हाधिकारी , ,तहसिलदार नायब तहसिलदार यांना देण्यात आले, 
पुरोगामी पञकार संघाचे महाराष्ट् संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी यांच्या आदेशावरून  
 आज राज्यात  एकाच वेळी संघाकडून निवेदन देण्यासाठी जाहिर केले होते  त्यांच्या आदेशावरुन बीड जिल्हातील बीड , गेवराई , माजलगांव , आंबाजोगाई , परळी-वै धारुर केज यातालूक्यात पुरोगामी पञकार  संघाकडून त्या  केलेल्या हल्ल्याचा निषेध करुन शाखा परळी पुरोगामी पत्रकार संघवतीने आज परळी येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.या घटनेबद्दल स्थानिक प्रशासनाकडे नोंदविण्यात आला. घटनेची चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी असे परळी चे  तहसीलदार विपीन पाटील यांना  पुरोगामी  पत्रकार संघाचे परळी  तालूकाध्यक्ष : अमोल सुर्यवंशी  यांच्या हस्ते देण्यात आले 
याप्रसंगी उपस्थित बीड जिल्हाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, प्रा, हनुमंत मगर जिल्हा सचिव, शेख सय्यद अफसर इसाक जिल्हा-उपाध्यक्ष , पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment