* हर्ष पोद्दारांच्या काळात लाचखोरीला थारा नाही.
बीड;- (प्रतिनीधी ) पोलिस खाते पैसे घाण्यासाठीच असते, असे म्हणत, माझ्या नातेवाईकाकडून पाच हजार का घेतले? अशी विचारणा करणारी आणि गुन्हे अन्वेषण विभागात पैशेच घेतले जातात, असा दावा करणारी दोन पोलिस कॉन्स्टेबलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीड पोलिस दलात खळबळ उडाली. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना सदरील ऑडीओ क्लिप मिळाल्यानंतर त्यांनी आज तडकाफडकी ऑडिओ क्लिपमध्ये चर्चा करणार्या दोन पोलिस कर्मचार्यांना निलंबीत केले. गेल्या चार दिवसांपूर्वी या दोघांना कंट्रोलला घेतले होते.
बीडच्या एलसीबीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया करणार्या पोलिस कर्मचार्याने आरोपीच्या नातेवाईकांकडून पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी त्या दोन्ही कर्मचार्यांची एलसीबीमधून कंट्रोलला बदलली केली होती. त्यानंतर त्या लाचखोर दोन पोलिसांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये लाचखोर पोलिस कर्मचारी निर्लज्जपणे आरोपीच्या नातेवाईकाकडून लाच मागत पैसे घेणे पोलिसांचे कामच आहे अशी मुक्ताफळे उधळतात. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोर कर्मचार्यांमुळे खाकीची लक्तरे वेशीला टांगली गेली. बीड जिल्हा पोलिस दलात बोकाळलेला भ्रष्टाचार सध्या वेगवेगळ्या मार्गाने समोर येत आहे. यापुर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गाड्या सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पेठ बीड पोलिस ठाण्यातील वेगवेगळ्या कर्मचार्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता पोलिस दलातील महत्त्वाच्या असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचार्यांचीच लाचखोरी समोर आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा विभाग संभाळणार्या सानप नामक कर्मचार्याला स्थानिक गुन्हा शाखेतील दुसर्या एका कर्मचार्याने फोन करून जेलमधून सुटलेल्या आरोपीच्या प्रतिबंधात्मक जामिनीसाठी पैसे मागण्यात आले असून तो आरोपी आपलाच पोलिस खात्यातील एका कर्मचार्याचा नातेवाईक असल्याचे सांगतिले. यावर मला कशाला बोलता पीआयला बोला आणि पैसे मागितले तर बिघडले कोठे? पोलिसांचं कामच आहे पैसे घ्यायचं, पैशाशिवाय कोणी जगू शकतो का? अशा प्रकारे उत्तर दिल्याचे या ऑडिओमध्ये आहेत. पुर्वी जेलमधील सुटलेल्या आरोपींकडून पैसे घेतले जात नव्हते. मात्र परवापासून हे सुरू झाले आहे. असे निर्लज्ज उत्तरेही देण्यात आली आहे. यामुळे बीड जिल्हा पोलिस दलात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी भ्रष्टाचार किती बोकाळला आहे आणि पोलिसांनी याचे दुकानच कसे मांडले आहे हे समोर आले आणि पुन्हा एकदा बीड पोलिसांची अब्रू वेशीला टांगली गेली. याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घेऊन कंट्रोलला पाठवलेल्या त्या दोन्ही पोलिसांना निलंबीत केले.
*हर्ष पोद्दारांच्या काळात लाचखोरीला थारा नाही*
जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हे लाचखोरीविरोधात प्रचंड आक्रमक असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. जे पोलिस कर्मचारी, अधिकारी लाच घेतात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई हर्ष पोद्दार अत्यंत ताठरपणे करतात. याआधीही अनेक लाचखोर पोलिस कर्मचार्यांना निलंबीत केले आहे. आज पुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कर्मचारी यांचे निलंबन केले आहे
No comments:
Post a Comment