बीड;- (प्रतिनीधी ) ९ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने बीड शहर लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सामान्य नागरीकांना किराणा सामान आणून देण्यासाठी प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये चक्क एका मयत शिक्षकाची नियुक्ती वार्ड क्र.१४५ करून आपण किती ‘अक्कलवान’ आहोत याचा प्रत्यय दिला आहे.
एक तर चोहीकडूनच सध्या शिक्षक वर्गाला अपमानाला सामोरे जावं लागत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षक सोडले तर यामध्ये नियुक्त केलेले काही माध्यमिक विभागाचे शिक्षक बिन पगारी आहेत. एक तर पगार न देवून त्यांचा सरकारने आत्मसन्मान गमवला असतांनाच दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरीक आणि किराणा दुकानदाराकडे किराणा सामान दुरध्वनीद्वारे मागणी केल्यास त्या ग्राहकाला हे किराणा सामान पोहच करण्याची जिम्मेदारी शिक्षक वर्गावर येवून ठेपली आहे. जिल्हा प्रशासनानेही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक या कामी नियुक्त केले आहे. बीड जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या शिक्षकामध्ये चक्क एका मयत शिक्षकाची हे सामान नेमुण देण्यासाठी नियुक्ती आदेश काल काढले. मात्र या शिक्षकाचे निधन झाल्याचे शिक्षण विभागाच्या ध्यानी पण नव्हते. आज दुपारी १ वाजता जेंव्हा हे शिक्षणाधिकारी बहिर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही चुक झाल्याचे मान्य करत दुरूस्ती करण्याचेही कबुल केले. शिक्षण विभाग आणि शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देण्या ऐवजी एक तर असल्या कामात शिक्षकांना गुतवले ही एक चुक आणि त्यात मयत शिक्षकाची नियुक्ती करून परत एकदा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आपल्या स्वत:चेच हसू करून घेतले आहे.
No comments:
Post a Comment