Wednesday, July 22, 2020

धक्कादायक ! धोंडराई केंद्रात जि.प.च्या शाळा सुरू गट शाळेच्या नावाखाली एकाच ठिकाणी पाच-पंचवीस मुलांना शिक्षण.

* शाळा शिकवायला जाणारे शिक्षक बीड शहरातले.

* राज्यात शाळा बंद मग या केंद्रातच कशा चालू?

बीड (प्रतिनीधी )- कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेून ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शहरालगतच्या धोंडराई केेंद्रातील वरवटी, पालवण, गवळवाडीसह अन्य गावात जिल्हा परिषदेच्या शाळा गट शाळेच्या नावाखाली सुरू आहेत. सदरची बाब चांगली की वाईट यापेक्षा या ग्रामीण भागामध्ये शिकवायला जाणारे शिक्षक हे बीड शहरातून जात असल्याने गट शाळेच्या नावाखाली शाळेच्या प्रांगणात अथवा अन्य ठिकाणी सुरू केलेल्या या शाळा विद्यार्थ्यांसाठी  धोकादायक राहतील, कारण विद्यार्थी जरी स्थानिकचे असले तरी शिकवायला येणारे मात्र शहरातले आहेत. 
  राज्यभरातील शाळा, महाविद्यालये सुरू करायचे की नाही, यावर मत-मतांतरे आहेत. त्यातच ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत त्यांची अडचण आहे हे उघड सत्य नाकारता येणारे नाही. परंतु अशा स्थितीत शाळा भरून ओढावून घेणंही अवघड आहे. राज्यभरातील शाळा बंद असताना बीड तालुक्यात धोंडीपुरा केेंद्रातर्ंगत काही शाळा गट शाळेच्या नावाखाली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या बाहेर ओरांड्यात अथवा अन्य ठिकाणी या शाळा भरविल्या जात असून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे या विघार्थ्यांना शिकवण्यासाठी जाणारे शिक्षक हे बीड शहरामध्ये राहत असून संबंधित गावात ते रोज ये-जा करत आहेत. पालवण, वरवटी, गवळवाडी यासह या केेंद्रातल्या अन्य काही गावात शाळा सुरू असल्याचे समोर आले असून या प्रकरणी शिक्षण विभागाला विचारणा केली असता गट शाळेबाबत त्यांनी सकारात्मकता दाखविली. मात्र बीडवरून शिक्षक त्या ठिकाणी जातात ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली तेव्हा त्यांनाही उत्तर देता आले नाही. बीड जिल्ह्यात केवळ धोंडराई केंद्रातच अशा प्रकारचे वर्ग चालू असल्याचे उघड होत असून काही ठिकाणी दोन-चार मुलांचा गट दिसून येतो तर काही ठिकाणी मात्र पाच-पंचेवीस पेक्षा जास्त मुले शिक्षण घेताना पहावयास मिळतात. आता या प्रकरणाकडे शिक्षण विभाग कसे पाहते आणि शाळा सुरू आहेत की नाहीत, याबाबत उत्तर कसे देते हे पाहण्यासारखे राहील.

No comments:

Post a Comment