Tuesday, July 7, 2020

प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतकुटुंबाचे आधार कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन.

  बीड, दि, 7 :- (प्रतिनीधी ) बीड जिल्ह्यातर्गत ग्रामपंचायतनिहाय कुटुंब सर्वेक्षण 2019 पर्यत करण्यात आले आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत  ग्रामपंचायतनिहाय ऑपरेटरव्दारे नोंदणी चालू असून संबंधीतांनी प्रपत्र"ड"सर्वेक्षणामधील कुंटुंबाचे आधार कार्ड नोंदणी करावी. 
सर्वेक्षण करण्यात आलेल्या कुंटुबांचे आधार नोंदणी आवास सॉप्ट प्रणालीवर नोंदणी करणे गरजेचे असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे प्रपत्र ड यादी मधील ज्या कुंटुंबाचे आधार क्रमांक नोंदणी करण्यात आलेली नाही अशा कुंटुबांचे आधार क्रमांक नोदणी करण्याची कार्यवाही बीड जिल्ह्यातंर्गत ग्रामपंचायतनिहाय ऑपरेटरव्दारे चालू आहे. आधार नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क अथवा रक्कम भरणा करु नये. जर आधार नोंदणीसाठी रकमेची मागणी अथवा, अडवणूक करीत असल्यास गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प संचालक , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment