Wednesday, July 15, 2020

कोरोना संकटात शेतकऱ्यांच्या विम्या साठी खा.डाॕ.प्रीतम मुंडे यांची दिल्ली स्वारी यशस्वी .

अंबाजोगाई ;-( प्रतिनिधी )एखादा प्रश्न मार्गी लावायाचा असेल तर लोकप्रतिनिधीच्या अंगात जिद्द आणि तळमळ असावी लागते ?बीड विमा प्रश्नावर अखेरपणे लढा देणाऱ्या खा .डॉ प्रितमताईनी कोरोना संकटात घराबाहेर कोणी पडेना , आशा वेळी चक्क दिल्ली गाठून देशाचे कृषीमंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेवून बीडच्या शेतकऱ्या साठी विमा कंपनी नियुक्तीची मागणी केली . खासदार दिल्ली सोडत नाही तोच ,?तोमर यांनी दखल घेत सुचना केल्या , परिणाम शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला .
     म्हणुन " येथे पाहिजे जातीचे , येरा गबाळ्याचे काम नव्हे " नेत्रत्व खमक्या असेल तर जनहिताचे प्रश्न मार्गी लागतात .
मागच्या महिन्यापासून बीड जिल्ह्यात विमा प्रश्न गाजत आहे. वास्तविक पाहता यंदा काय झालं, कळत नाही .पण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा भरून घेण्यासाठी एकही कृषी कंपनी  पुढे आलीनाही. त्याची कारणं अनेक असली, तरी  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे. कोट्यावधी रुपयाचा विमा मिळालेला आहे. मात्र यावर्षी चक्क विमा भरण्यासाठी कंपनीत मिळाली नाही, हे कारण पुढे आले. या प्रश्नावर जिल्ह्याच्या खासदार स्वस्त बसणार, त्या खासदार कुठल्या? त्यांनी तात्काळ आगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी ,आणि कृषी मंत्री यांना पत्र लिहिले. त्यापाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री ,आणि कृषिमंत्री, यांनाही पत्र पाठवले .परिणाम केंद्र आणि राज्य पातळीवर विमा कंपनी नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र काल खासदार प्रीतम ताईनी चक्क, दिल्ली गाठली खरतर कोरोना संकटात लोकप्रतिनिधी बाहेर पडत नाहीत? आणि तेही मुंबईसारख्या हाय रिस्क ,भागांमधून तर ते शक्य नाही? मात्र डॉ. प्रीतम ताई मुळात  जिद्द आणि चिकाटी ,चे नेतृत्व आहे. एखादा प्रश्न हातात धरला ?मार्गी लावले शिवाय त्या स्वस्थ बसत नाहीत. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, दिल्ली गाठली आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा दरवाजा, ठोठावला. त्यांना निवेदन दिले आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेल्या अन्यायाची ची माहिती सांगितली. परिणाम असा झाला .केंद्रीय पातळीवर सूत्र हल्ली. त्या दिल्लीहून परत येईपर्यंत .विमा भरण्यासाठी राज्य आणि केंद्रीय पातळीवर अनुकूल वातावरण तयार झाले, ज्यामुळे आता विमा प्रश्न सुटला. असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या साठी कोरोना  संकटात हा फार मोठा दिलासा म्हणावा लागेल .बाकी काही असले तरी ,या प्रश्नावर खासदारांनी जिवाचं रान केलं .आणि हा प्रश्न मार्गी लावला .त्याबद्दल बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांमधून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment