Friday, July 24, 2020

केज तालुक्यातील कळंबआंबा गावाने कोरोना पाॕझिटिव्ह परिवारालाच टाकले वाळीत.


केज  (प्रतिनीधी )- कोरानाबाधीतांच्या कुटुंबियाकंडे आता संशयित नजरेने पाहीतलं जात असून ते जणू क्षुद्र आहेत, अशाच स्थितीत त्यांना वागणूक मिळत असल्याने कोरोना सारख्या महाभयंकर महामारीत कोरोना बाधीत आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य खचवणारे कार्य लोक माणसातून होत आहे हे दुर्दैव जशी देशाची लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवून मजबूत ठेवली तशाच प्रकारे सर्वांनी सर्वांसोबत सर्वांसाठी राहून कोरोनाला हरवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. मात्र केज तालुक्यातील कळंबआंब्यात एका घरातील वृद्ध कोरोना बाधीत आल्यानंतर गावाने त्या घराला वाळीत टाकले आहे. त्या घराकडे फिरकून कुणी पाहत नाही, त्यांना ना दूध दिले जाते ना किराणा सामान गेल्या पाच-सात दिवसांपासून तेथील घरातील व्यक्तींची मानसिकता अक्षरश: अस्थिर असून गावकर्‍यांनी घरापासून काही अंतरावर मोठा खड्डा बांधून कोणाशी या घराशी संपर्क येणार नाही याची बेजबाबदार दखल घेतली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर त्या ठिकाणी आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने जायला हवे, मात्र तेथे केवळ आशा ताई गेली आणि सॅनिटायझर युक्त पाणी घरात टाकून निघून गेली ती परत गावात परत आलीच नाही. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
कांतीकारी साथी  सर्व जनतेला आवाहन करत आहे, कोरोना बाधीत झाला म्हणजे त्याला आणि त्याच्या घराला वाळू टाकू नका. सोबत राहून डिस्टन्स पाळून कोरोनासारख्या महामारीचा सामना करा.

No comments:

Post a Comment