Thursday, July 16, 2020

खाजगी डाॕक्टरांनी कोरोना संशयीतांची माहीत आरोग्य विभागाला कळवा नसता कठोर कारवाईला सामोरे जा.


बीड (प्रतिनीधी )- बीड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्ण वाढतच चालले आहेत तेव्हा आरोग्य विभागाने कॉन्ट्रॅक्ट ट्रॅकिंग केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली असून हे बाधीत रुग्ण याआधी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन आलेले असल्याचे बहुतांशी ठिकाणी उघडकीस आले आहे. याआधी आरोग्य विभागाने खासगी डॉक्टरांना कोरोना संशयितांची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आदेश दिले असताना खासगी डॉक्टर याकडे दुर्लक्ष करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी कोरोना संशयित अथवा कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णाची तात्काळ जिल्हा आरोग्य विभागाला माहिती न दिल्यास संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाईल, असा पत्राद्वारे आदेश दिला आहे. 
याबाबत अधिक असे की, जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने बाधीतांचे कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग केले असता धक्कादायक बाब समोर आल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बहुतांशी रुग्णांनी खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी एक आदेश काढला आहे. त्या आदेशात ते म्हणतात, खासगी वैद्यकीय व्यवसाय व खासगी औषध विक्रेते यांना यापूर्वी लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र काही वैद्यकीय व्यवसायिक वेळेवर तत्परतेने कोरोना संशयित अथवा लक्षण असलेल्या रुग्णांची माहिती वेळेवर आरोग्य विभागाला देत नाहीत. त्यामुळे आता जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांसह खासगी औषध विक्रेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून सक्त ताकीद देण्यात आली असून कोरोना संशयित अथवा लक्षण आढळलेल्या कुठल्याही व्यक्तीवर उपचार केले असता याची तात्काळ माहिती जवळच्या कोविड सेंटर अथवा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांना फोन, एसएमएसद्वारे अथवा प्रत्यक्ष कळवावी, या कामात कुचराई केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे

No comments:

Post a Comment