मुंबई :- (प्रतिनीधी ) सध्याच्या करोना कालखंडात सोशल मिडीयावर अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी राज्याच्या सायबर क्राईम प्रतिबंधक विभागाने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. ते नक्कीच वाचा आणि फॉलो करा, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते पोलीस कारवाई.
सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअँपवर तसेच अन्य सोशल मीडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नाव व अन्य माहिती प्रसारित होत आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना अशी विनंती करते की,कृपया तुम्हाला अशा आशयाचा काही पोस्ट्स आल्या तर आपण त्या पोस्ट्स पुढे पाठवू नये. रुग्णांची माहिती अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त करा, व ग्रुप ऍडमिनने अशा सदस्यांची ग्रुपमधून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग 'only admin' असे करावे.
कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे असे मेसेज, विडिओ, किंवा पोस्ट्स टाकणाऱ्या व्यक्तींवर व संबंधित व्हाट्सअँप ग्रुप ऍडमिन्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागामार्फत देण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील जुनाशहर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या 3 वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईल वर शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
No comments:
Post a Comment