* हॉस्पिटल बंद ठेवणार्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा -के.के. वडमारे
बीड (प्रतिनीधी )- बीड शहरासह जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयचा मनमानी कारभार सर्वजण पाहत आहेत एरवी कुठलाही आजार कुठलाही रोग आला तर रुग्णांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारणारे खाजगी डॉक्टर आज हॉस्पिटल बंद करून रुग्णांची पिळवणूक करत रुग्णांना जाणीवपुर्वक मानसिक त्रास देत आहेत त्यामुळे काल जिल्हाधिकारी यांना व्हाट्सऍप मेसेजवर माहिती देऊन संबंधित रुग्णालय न उघडणार्या खाजगी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते के.के. वडमारे यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी आपण आंदोलन छेडणार असल्याचेही वडमारे यांनी म्हटले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सर्व खाजगी डॉक्टरांना हॉस्पिटल बंद का आहेत? याचा जाब विचारावा व जे हॉस्पिटल बंद आहेत अशा डॉक्टरांवर ते कारवाई का करत नाहीत? सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालय उघडे ठेवणे अत्यावश्यक असून नागरिकांना विविध आजारांची लागण होते तर काहींना गंभीर आजार असते अशा वेळी नागरिकांनी कोणाकडे जायचे? काही डॉक्टर रुग्ण त्यांच्या रुग्णालयात गेल्यानंतर ते सरळ-सरळ सरकारी दवाखान्याचा मार्ग दाखवतात. मात्र उपचार करण्याचे दायित्व ते दाखवत नाहीत. यामुळे रुग्ण अडचणीत सापडलेले आहेत. काहीजण अशी परिस्थिती पाहून रुग्णालयात जाणेही टाळत असल्याने त्यांचे आजार गंभीर होत आहेत. दुसरीकडे शस्त्रक्रियाही थांबलेल्या आहेत. या सर्व बाबींसंदर्भत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी वॉटस्ऍपवर संपर्क साधून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवलेले आहेत. शहरातील जे रुग्णालय सुरू नसतात अशा रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचे के.के. वडमारे यांनी म्हटले आहे. दरम्यान डॉक्टरांनी आपला मनमानीपणा न थांबवल्यास १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वडमारे यांनी दिला.
No comments:
Post a Comment