Sunday, July 12, 2020

गेवराईत क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणाची गळफास घेवून आत्महत्या.

बीड(दि.१२)- बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा जवळील बाभळदरा तांडा येथील काॅरंटाईन असलेल्या ३५ वर्षीय तरुणाने, गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे , गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना , काही वेळापूर्वी उघडकीस आलीय..
गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये काॅरंटाईन असलेल्या , एका ३५ वर्षीय तरुणास , शुक्रवारी गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.त्याचा स्वॅब शुक्रवार रोजी घेण्यात आला होता.. त्याचा अहवाल येण्या आधीच , त्याने शनिवारी रात्री क्वारंटाईन सेंटर मधील पंख्याला , रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.. ज्यावेळी तेथील न.प.कर्मचाऱ्यांनी जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले , त्यावेळी कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने , कर्मचाऱ्यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पाहिले असता , त्यांना सदरील संशयित युवक, गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, फौजदार सुनील ऐटवार, विशाल प्रधान, राजू वाघमारे, आरोग्य विभागाचे डॉ.मुकेश कुचेरिया, तलाठी राजेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेअसल्याची माहिती मिळाली होती.

No comments:

Post a Comment