* सरकाने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप.
आष्टी (प्रतिनीधी )-नुकताच राज्यातील ग्रामपंचायतच्या मुदती संपल्याने त्या सरपंचाचा अधिकार राज्य सरकारने कुणालाही प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा जीआर नुकताच काढल्याने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा तसेच या सरकाने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप राज्याचे माजी राज्यमंञी आ.
सुरेश धस यांनी केला आहे.
याबाबत पुढे बोलतांना आ.धस म्हणाले, एक शासनाने सरपंचाची निवड जनतेन होत असतांना तो निर्णय रद्द केला आता परत नविनच जीआर या शासनाने काढला आहे.ह्या प्रशासक निवडाचा घेतलेला निर्णय म्हणजे राज्यशासनाने एक प्रकारे लोकशाहीवर अतिक्रमण केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.ज्या ग्रामपंचायतच्या मुदत संपल्या आहेत तेथे त्यांनी सध्या आहे त्याच सरपंचला सहा महिने मुदत वाढवून देण्याची गरज आहे.परंतु हे डुकडुगं तीन पायाचं असलेलं सरकार म्हणाला वाटेल तसे निर्णय घेत असून,लोकशाहिचा गळा घोटत असल्याचा आरोपही आ.धस यांनी केला.
No comments:
Post a Comment