Saturday, July 4, 2020

आत्महत्या रोखण्यासाठी बीड पोलीसांचा प्रोजेक्ट सहय्यता उपक्रम.

बीड;-(प्रतिनीधी ) कोरोनामुळे अनेकांची नौकरी गेली असून व्यवसाय धंदाही बंद आहे. त्यामुळे अनेकांना संसार कसा चालवावा याची चिंता आहे. त्यातच घरगुती भांडणामुळे वादविवाद मोठ्या प्रमाणात होतात. खूनासारख्या घटनाही समोर आल्या आहेत. तर अनेक जण नैराश्यामुळे आत्महत्या करतात. हे रोखण्यासाठी पोलीसांच्यावतीने प्रोजेक्ट सहाय्यता हा उपक्रम राबविण्यात येत असून यासाठी नैराश्यग्रस्त कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस अधिक्षक कार्यालयात अधिकारी आणि ठाणे प्रमुखांना देण्यात आले. यावेळी मानसोपचार तज्ञ मोहम्मद मुजाहीद, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.
मानसोपचार तज्ञ डॉ.महोम्मद मुजाहीद यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांसह पोलीस कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्ह्यात मानसीक आजाराचे रुग्ण वाढत आहे. त्याचे लक्षणे काय असतात. त्यांची उपचार पध्दती व ते नैराश्यग्रस्त कसे आहेत हे कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण काल पोलीसांना देण्यात आले. जे नैराश्यग्रस्त आहे त्यांच्यासाठी प्रोजेक्ट सहाय्यता हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले

No comments:

Post a Comment