Thursday, July 9, 2020

परळीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पाच कृषी सेवा केंद्र सील.महसूल,पोलीस व नगर परिषदेची संयुक्त कारवाई.


पराळी वैजनाथ ;- (प्रतिनीधी ) परळी शहरात कोरोना रुग्णाच्या संख्खेत वाढ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 5जुलै ते 12 जुलै 2020 पर्यत शहर संपुर्ण लाॕकडाउन घोषीत करुन संचारबंदी लागु केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन शहरातील मोंढा परिसरात कृषी सेवा केंद्राचे 5 दुकाने अनधिकृत पणे उघडी ठेवण्यात आली होती.याची स्थानिक प्रशासनाला माहिती मिळताच नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,न.प.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे व तलाठी राजेरी यांनी कृषी सेवा केंद्राला भेट दिली विष्णू ट्रेडर्स,वैद्यनाथ ऍग्रो एजन्सीज,गोपाळकृष्ण कृषी सेवा केंद्र,न्यू श्रीराम फर्टिलायझर्स व कोमल फर्टिलायझर्स हे दुकाने उघडी आढळुन आली. या कृषी सेवा केंद्रावर परळी महसूल,पोलीस व नगर परिषदेची संयुक्त कारवाई करत दुकाने सील करण्यात आली आहेत.या कार्यवाहीत न.प.कर्मचारी बालाजी कारले,सचिन पोकळे,शे.जमीर हजर होते.

No comments:

Post a Comment