परळी :येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते उपजिल्हा रुग्णालय रोड दरम्यान बँकेच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होत आहे ,बँकेचे खातेदार रस्त्यावरच वहाने लावत असल्याने रहदारीला अडथळा होत आहे याकडे बँक प्रशासन व पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष अश्विन मोगरकर व राष्ट्रवादी चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केली आहे.येथील राणीलक्ष्मीबाई टॉवर चौक जवळच राष्ट्रीयकृत बँकेचीे शाखा आहे या शाखेसमोर आपली वहाने लावून खातेदार बँकेत जातात ,काही मोठ्या गाड्या ही बँकेसमोर लावून एक तास खातेदार बँकेचे बाहेर येतच नाही .त्यामुळे इतर वाहनांना ही या मार्गावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे व वाहतुकीस अडथळा होत आहे याकडे संबंधित बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे तसेच पोलिसांनीही यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन हा रस्ता बँकेच्या वेळेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी मदत करावी अशी मागणी अश्विन मोगरकर व राष्ट्रवादी चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केली आहे
No comments:
Post a Comment